Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तूर डाळीच्या दरात वाढ

दरवढीमुळे सामान्य नागरिक आर्थिक संकटात

नवी मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र हा देशातील प्रमुख तूर उत्पादक राज्य असून यंदाच्या वर्षी हवामान बदलामुळे तुरीचे उत्पादन घटले आहे. सामान्यांच्

त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपची सत्ता
विजय स्तंभास लाखो आंबेडकरी अनुयायांनी केले अभिवादन
चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच केला पत्नीचा खून I LOKNews24

नवी मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्र हा देशातील प्रमुख तूर उत्पादक राज्य असून यंदाच्या वर्षी हवामान बदलामुळे तुरीचे उत्पादन घटले आहे. सामान्यांच्या जेवणातील डाळ यामुळे प्रचंड महाग होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत तूर डाळीला प्रति क्विंटल आठशे रुपये भाव मिळत असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पेट्रोल आणि गॅस दरवढीमुळे मेटाकुटीला आलेला सामान्य नागरिक आता डाळींचे भाव वाढल्याने आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. भाव वाढल्याने बाजारपेठेत ग्राहकच येत नसले तरी व्यापारीवर्ग मात्र भाव वाढ झाली नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतायत. सध्या एपीएमसी बाजारपेठेत चांगल्या प्रतीची तूरडाळ 130 रुपये प्रतिकिलो या दराने भेटत असून भविष्यात या दरात आणखी वाढ होणार असल्याचे व्यापारी सांगतायत।

COMMENTS