प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ ; मुंबै बँकेची निवडणूक प्रकरणात गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ ; मुंबै बँकेची निवडणूक प्रकरणात गुन्हा दाखल

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून, मुंबई पोलिसांनी मुंबै बँक मजूर सहकारी सोसायटी प्रकरणात

औद्योगिक क्लस्टरच्या अडचणी केंद्र सरकार सोडवणार : गड़करी
दरड कोसळली, कैलास यात्रेमधील प्रवासी अडकले
संजीवनी युवा प्रतिष्ठानचा सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून, मुंबई पोलिसांनी मुंबै बँक मजूर सहकारी सोसायटी प्रकरणात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. दरेकर यांनी मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांची फिर्याद नोंदवून घेत माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात भादंवी कलम 199, 200, 406, 417, 420, 465, 467 आणि 120 (ब) अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुंबै जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर हे मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही वर्गातून उभे राहिले होते. मात्र, निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच दरेकर यांना मजूर वर्गासाठी अपात्र घोषित करण्यात आले. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातील संचालकपदाचा राजीनामा दिला होता. आपच्या तक्रारीवरून सहकार विभागाने नोटीस बजावत, आपण मजूर आहात की नाही, अशी विचारणा दरेकर यांना केली होती.दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात कुटुंबाची स्थावर मालमत्ता 2 कोटी 9 लाख रुपये असल्याचे दाखवले होते. तसेच विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना 2 लाख 50 हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे आपण प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नसल्याचेही नोटिशीत नमुदकेले होते. अखेर सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून दरेकर यांना अपात्र घोषित केले. त्यानंतर आपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती सहकार विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरुच ठेवली होती. शेवटी सहकार मंत्रालयाच्या नव्हे तर आम आदमी पक्षाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.

शिवसेनेकडून दरेकर यांच्या अटकेची मागणी
प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल होताच शिवसेनेने त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी म्हटले की, जर विरोधी पक्षनेत्यावर एफआयआर दाखल झाला असेल तर त्यांना या सभागृहात येण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांना या पदावरदेखील राहण्याचा नैतिक अधिकार नाहीये. त्यामुळे प्रवीण दरेकर यांचा भाजपने राजीनामा घेतला पाहिजे. आज आम्ही महाविकास आघाडी सरकारमधील विधानपरिषदेतील सर्व आमदारांनी मागणी केली की त्यांना अटक केली जावी. नाना पटोले म्हणाले, भाजपने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई केली तर ती सुडबुद्धीने असते आणि जो करेल तो भरेल असं ते सांगतात. पण बँकच लुटली गेली आणि दरोडा टाकला गेला.

COMMENTS