Homeताज्या बातम्या

राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ

100, 200 रुपयांचे स्टँप बंद करण्याचा निर्णय

मुंबई : अतिशय महत्वाच्या दस्तऐवजासाठी मुद्रांक अर्थात स्टँप खरेदी करावे लागतात. मात्र राज्य सरकारने आपला महसूल वाढवण्यासाठी 100 आणि 200 रूपयांचे

भोंदू बाबाच्या सांगण्यावरून आई -वडिलांची मुलीला जबर मारहाण मारहाणीत मुलीचा मृत्यू.
कोरोना आपत्ती आणि गृहमंत्रीपदाचा देशमुख यांचा राजीनामा l Lok News24
पालकमंत्री विखेंनी घेतला पंतप्रधान मोदींच्या सभेच्या तयारीचा आढावा
Stamp Duty : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर असलेले मुद्रांक शुल्क माफ  करणेबाबत शासन नियम !

मुंबई : अतिशय महत्वाच्या दस्तऐवजासाठी मुद्रांक अर्थात स्टँप खरेदी करावे लागतात. मात्र राज्य सरकारने आपला महसूल वाढवण्यासाठी 100 आणि 200 रूपयांचे मुद्रांक रद्द करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांना आता 500 रूपयांचे मुद्रांक खरेदी करावे लागणार आहे. त्यातून राज्य सरकारच्या महसुलात भर पडणार असली तरी सर्वसामान्यांना मात्र नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
नोटरी असो की, तहसील कार्यालयाशी संबंधित कोणतेही काम असतो मुद्रांक आवश्यक असतो. मात्र राज्य सरकारने 100 आणि 200 रूपयांचा मुद्रांक रद्द केल्यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा भूर्दंड बसणार आहे. कारण, आता किमान 500 रुपयांच्या मुद्रांकवरच खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतित्रापत्र दिले जाणार आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय घेतल्यामुळे महसूल विभागाकडून आता केवळ 500 रुपयांचे मुद्रांक जारी केला जाणार आहे. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. राज्य शासनाने सरकारचा महसूल वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
तहसील किंवा महसूल कार्यलयात अवघ्या शंभर, दोनशे रुपयांत स्टँप केले जात. वैयक्तिक कारणांसह बँक व विविध कामांसाठी केल्या जाणार्‍या प्रतिज्ञापत्रासह साठेखतानंतरचे खरेदीखत, हक्क सोडपत्रासाठी आता पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे. राज्य सरकारने ’लाडकी बहीण’ योजनेसह विविध प्रकारच्या योजनांवर कोट्यवधी रुपयांची खैरात केल्याने अन्य योजनांसाठी निधी कमी पडू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी मुद्रांक शुल्कात वाढ केल्याची चर्चा महसूल खात्यांतर्गत बोलली जात आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारने लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे, आता महसूल वाढविण्यासाठी नवनवीन प्रयोग केला जात आहेत. प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र, साठेखत केल्यानंतर पुन्हा खरेदीखत करताना ते शंभर रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर केले जात होते. त्यासाठी आता शंभरऐवजी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क वापरण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयातील कामांसाठी मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यामध्ये, कोणताही बदल झाला नसल्याचीही माहिती आहे.

सरकारकडून सर्वसामान्यांची लूट : वडेट्टीवार
लाडकी बहीण योजना आणली त्याच्या जाहिरातीवर करोडो रुपये खर्च केले जात आहे, इतर योजनांना कट लावला जात आहे. पैसे आणणार कुठून म्हणून मुद्रांक शुल्काच्या निर्णय घेतला आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, आता छोट्याश्या कामासाठी 500 रुपयाचे शपथपत्र द्यावे लागणार, ही लूट आहे. सरकार हे एका हाताने देतात, दुसर्‍या हाताने लुटतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

COMMENTS