Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात एसटीच्या फेर्‍यांमध्ये वाढ; उत्पन्न वाढल्याने प्रशासनाकडून निर्णय

सातारा / प्रतिनिधी : कोरोनाच्या साथीनंतर हळू-हळू पुर्वपदावर येवू लागलेल्या एसटीला दिपावली निमित्त लागलेले विलीणीकरणासह पगारवाढीचे ग्रहण सुटता सुट

पर्यटन मंत्र्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करण्याची गरज : आ. शशिकांत शिंदे
पावसाळ्यात अतिवृष्टीने निर्माण होणार्‍या पुरग्रस्त भागाची पहाणी
धुळोबा डोंगरावर ट्रेकिंग करताना व्यावसायिक सुहास पाटील यांचा मृत्यू

सातारा / प्रतिनिधी : कोरोनाच्या साथीनंतर हळू-हळू पुर्वपदावर येवू लागलेल्या एसटीला दिपावली निमित्त लागलेले विलीणीकरणासह पगारवाढीचे ग्रहण सुटता सुटेना. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून सामान्य जनतेला गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मागील महिनाभरापासून संपातील धग कमी होवू लागली आहे. सातारा जिल्ह्यातील महामंडळाचे कर्मचारी कामावर हजर होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच वर्कशॉपमधील कर्मचारी व वाहतूक नियंत्रकांना वाहक-चालकाचे काम करण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्यामुळे एसटीची चाके आता ग्रामीण भागाकडे वळू लागली आहेत. जिल्ह्यातील 11 आगारांत आतापर्यंत एक हजारहून अधिक कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे फेर्‍यांची संख्या दररोज 500 हून अधिक सुरु झाली आहे. तसेच एसटी पुन्हा पुर्ववत होत असल्याने प्रवाशांनी आता थोडे थांबेन पण एसटीनेच जाईन, असा स्टॅण्ड घेतल्याने राज्य परिवहन विभागाच्या सातारा विभागाचे उत्पन्न वाढू लागले आहे.
गेल्या वर्षी दिवाळीत राज्यभरातील महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. या संपात सुरुवातीला चालक, वाहकांसह सर्वच प्रशासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील 11 आगारांतील बस उभ्या होत्या. या परिस्थितीमुळे सतत वर्दळ असलेल्या बस स्थानकांमधील वाहतूक ठप्प झाली होती. मागील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी संपकरी व राज्य शासनाने चार बैठका घेतल्या. यामध्ये कर्मचार्‍यांना 41 टक्के पगारवाढ केल्याचे सांगण्यात आले. मात्र, काही संघटनांनी विलीनीकरण या मुद्द्यावर ठाम राहात आंदोलन सुरू ठेवले. मात्र, आता आंदोलनाचे वारे कमी होत कर्मचारी कामावर हजर होण्याचे प्रमाण वाढले आहे.
दरम्यान, मागील महिनाभरापासून कर्मचारी कामावर हजर होण्याचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यातील काही बस सुरू झाल्या आहेत. यामध्ये शिवशाही बसच्या 69 फेर्‍या, साध्या गाड्यांच्या 444 फेर्‍या अशा एकूण 535 फेर्‍या सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात एसटीच्या फेर्‍या वाढल्याचे दिसून येत आहे. सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून सातारा-पुणे विनाथांबा, सातारा-मुंबई व जिल्ह्यातील इतर आगारांतून बस फेर्‍या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातदेखील हळूहळू वाढ होत आहे. सातारा जिल्ह्यातील 11 आगारांत सद्यःस्थितीत चालक 101, तर वाहक 133 हजर झाल्याने एकूण 201 चालक व वाहक कामावर रुजू झाले आहेत. तसेच एसटीचे एकूण एक हजारांहून अधिक कर्मचारी कामावर रुजू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

COMMENTS