Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मधुमेह व उच्चरक्तदाब यामुळे किडनीविकारात वाढ :  डॉ. देवीकुमार केळकर

दुर्गामाता जेष्ठ नागरिक संघातर्फे व्याख्यान संपन्न

नाशिक : जीवनशैलीचा दैनंदिन जीवनमानावर होणारा बदल तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे किडनीच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे प्रतिपादन नारायणी हॉस्

मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवण्याची पालकांची जबाबदारी ः डॉ. गाडेकर
मस्जिदीत नमाज पठणावर रमजान काळात बंदी
`द कश्मीर फाइल्स` फेम पल्लवी जोशीचा अपघात

नाशिक : जीवनशैलीचा दैनंदिन जीवनमानावर होणारा बदल तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे किडनीच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे प्रतिपादन नारायणी हॉस्पीटलचे किडनीविकार तज्ञ डॉ. देवीकुमार केळकर यांनी केले. डॉ. देवीकुमार केळकर म्हणाले की, सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुज येणे, चेहरा किंवा पायावर सुज येणे,  लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करतांना त्रास होणे यासारखे लक्षणे दिसल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळीच निदान होऊन योग्य उपचार घेतल्यास पुढील आजार टाळता येणे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

दुर्गामाता ज्येष्ठ नागरिक संघ जेलरोड यांच्यातर्फे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात डॉ.केळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शैलेश ढगे, अध्यक्ष रमेश डहाळे,सचिव रविंद्र शहरकर, दिलीप सोनोने , मोतीराम बागुल, पंडितराव इंगळे, हेमराज चौधरी, अशोक वाणी उपस्थित होते.

डॉ.केळकर म्हणाले की, डायबेटिस होऊ नये असा विचार आपण करत असू तर सर्वांत आधी स्वतःचं निरीक्षण करताना आपलं वजन, रक्तातील साखरेची पातळी, जीवनशैली यांचा विचार करणे महत्वाचे आहे. यामध्ये  घरामध्ये डायबेटिसने मागच्या पिढ्यांमध्येच प्रवेश केला केला आहे अशा लोकांना डायबेटिसचा धोका जास्त असतो. त्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचेही डॉ. केळकर यांनी सांगितले.

COMMENTS