नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहू, मोहरीसह 6 पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आ
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहू, मोहरीसह 6 पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये, गव्हाच्या हमीभावात 150 रुपयांची वाढ, तर मोहरीच्या हमीभावात 300 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील कोट्यवधी शेतकर्यांना याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील गहू उत्पादक आणि हरभरा पीक घेणार्या शेतकर्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील शेतकर्यांनाही मोठा लाभ होईल.
यामध्ये गव्हाच्या किमतीमध्ये 150 रूपयांची वाढ करण्यात आल्यामुळे आता गव्हाला2 हजार 475 रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे. तर दुसरीकडे मोहरीच्या किंमतीत300 रुपयांची वाढ केल्यामुळे आता 5 हजार 950 रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे. जवसाच्या किंमतीत 130 रुपयांची वाढ आता 1 हजार 980 रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे. हरभर्याची किंमतीत 210 रुपयाची वाढ होऊन 5 हजार 650 रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे. मसूराच्या किंमतीत 275 रुपयांची वाढ होऊन आता 6 हजार 700 रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे. करडईच्या किंमतीत 140 रुपयाची वाढ होऊन आता 5 हजार 940 रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे.
COMMENTS