Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात 40 टक्के सवलतीसाठी मिळकतींचे होणार सर्वेक्षण

पुणे ः राज्य सरकारने 1970 पासून पुणेकरांना मिळकत करात लागू असलेली 40 टक्के सवलत काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात, दोन फ्लॅट असल

मीरा भाईंदरचे आयुक्त ईडीच्या रडारवर
तलावात बुडून ५ मुलांचा मृत्यू
मैद्याचे भाव वाढल्याणे बेकरी व्यवसाय आडचणीत 

पुणे ः राज्य सरकारने 1970 पासून पुणेकरांना मिळकत करात लागू असलेली 40 टक्के सवलत काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात, दोन फ्लॅट असलेल्या किंवा भाडेकरू ठेवलेल्या मिळकतधारकांचा समावेश केला. त्यांना 2019 ते 2023 या काळातील 40 टक्के सवलतीची रक्कम फरकासह भरण्याचा आदेश दिला. तसेच, 2019 पासून नव्याने नोंदणी होणार्‍या मिळकतींना सवलत दिली जाणार नाही, असेही ठरविले. मात्र, मार्च 2023 मध्ये महायुतीच्या राज्य सरकारने विधीमंडळ अधिवेशनात पुणेकरांना पुन्हा 40 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. महानगरपालिकेने केलेल्या जी आय एस सर्वेक्षणात एकच फ्लॅट (स्व-वापराकरिता) असणारे अनेक मिळकतधारक नजरचुकीने समाविष्ट झालेले आढळले. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश झाला होता त्यामुळे या मिळकतधारकांना कोणतीही पूर्वकल्पना अथवा नोटीस न देता, या वर्षी 2019 पासूनच्या फरकाच्या रकमेचे बिल आले होते.

COMMENTS