Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

के.जे.सोमैया महाविद्यालयात महिला तक्रार निवारण कक्षाचे उद्घाटन

कोपरगाव/प्रतिनिधी : स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महिला तक्रार निवारण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यां

शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये आंदोलन
पत्रकार बोठेची रवानगी नाशिक कारागृहात
कोविडचे संकट दूर होऊन नागरिकांचे जनजीवन सुरळीत व्हावे – तहसीलदार उमेश पाटील

कोपरगाव/प्रतिनिधी : स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महिला तक्रार निवारण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 ऑगस्ट रोजी महिला तक्रार निवारण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या कक्षाचे उद्घाटन कोपरगांव येथील प्रसिद्ध अ‍ॅड. प्रा. शितल देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. यादव व या कक्षाच्या प्रमुख डॉ.सुरेखा भिंगारदिवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. यादव यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालय स्तरावर मुली व महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘महिला तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शिका अ‍ॅड. प्रा.शितल देशमुख यांनी ’स्त्री-पुरुष समानता आणि कायदेविषयक जागृती’ या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात त्यांनी समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे.त्यासाठी समाजप्रबोधनाची,जनजागृतीची व सहकार्याची गरज असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेसाठी आमलात असलेले 18 महत्वाच्या कायद्याचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महिला संरक्षण कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, समान वेतन कायदा तसेच कौटुंबिक न्यायालय कायदा इत्यादी कायद्यांचा संदर्भ दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महिला तक्रार निवारण कक्षाच्या प्रमुख डॉ.सुरेखा भिंगारदिवे यांनी महिला तक्रार निवारण समितीची संपूर्ण कार्यप्रणाली व विद्यार्थीनीवर होणार्‍या छळावर प्रतिबंध करण्यासाठी महाविद्यालय स्तरावर राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना नमूद केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.पी.भावसार यांनी तर आभार प्रा.नीता शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.वर्षा आहेर, प्रा.येवले, प्रा. प्रतीक्षा डांगे, प्रा.निकिता फटांगरे, प्रा.पूजा कातोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापिका व बहुसंख्य विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

COMMENTS