बीड प्रतिनिधी - हजारो भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र पेंडगाव येथील हनुमंतरायांच्या कृपेने आपण पेंडगावच्या विकासासाठी भरीव निधी उपलब

बीड प्रतिनिधी – हजारो भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र पेंडगाव येथील हनुमंतरायांच्या कृपेने आपण पेंडगावच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देवू शकलो.यापुढेही विकासाचा हा यज्ञ आपण कायम सुरु ठेवूत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी तुम्ही शिवसेनेला साथ द्या आम्ही तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाहीत असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले. रविवार दि.6 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र पेंडगाव येथे 50 लक्ष रु.च्या विविध विकास कामांचा शुभारंभ जिल्हाप्रमुख खांडे यांच्या हस्ते झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख परमेश्वर नाना तळेकर, तालूकाप्रमुख संतोष घुमरे, प्रेम मामा गुरखुदे, रंजीत कदम, नवनाथ खांडे, पेंडगावचे सरपंच सोमनाथ पवार, उपसरपंच चंदन कोसले,पं.स.सदस्य किशोर अप्पा काळकुटे, माजी सरपंच कल्याणराव गाडे, मा ी उपरसपंच रेवण काळकुटे, ग्रा.पं.सदस्य सुनिल घनवट, व्हाईस चेअरमन कांताराव काळकुटे, जितेश काळकुटे, रामभाऊ काळकुटे,नामदेव कोसले, मागदे सर, चंदर धट, राम दांगट, सुरेश गाडे, मयुर राम बहिर,नामदेव भोसले, कचरु डोंगरे, बाबुराव गाडे, दत्तात्रय धट,पाटीलभाऊ काळकुटे, लक्ष्मण डोंगरे, गणेश घनवट, महेश काळकुटे, नंदकुमार धट, मुरलीधर काळकुटे, दत्तात्रय धट आदि उपस्थित होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी काही दिवसापुर्वीच श्री क्षेत्र पेंडगाव येथे विविध विकास कामांसाठी निधी देवू असे जाहिर केले होते. त्या आश्वासनाची रविवारी पुर्तता करण्यात आली. तब्बल 50 लक्ष रु.च्या विकास कामांचा जिल्हाप्रमुख खांडे यांच्या हस्ते पेंडगाव येथे शुभारंभ करण्यात आला.या विकास कामांमध्ये गाव अंतर्गत सिमेंट रस्ते, जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीची कामे आणि मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम आदिंचा समावेश आहे. या प्रसंगी श्री हनुमान मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बोलतांना जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले की, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेबांच्या सरकारने गतीमान विकासाला प्राधान्य दिले आहे. लोकाभिमुख शासन व प्रशासन कसे असावे याचे आदर्श उदाहरण म्हणून सध्याच्या महायुती सरकारकडे पाहिले पाहिजे. ग्रामीण भागाचा विकास हाच या शासनाचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण जनतेला हव्या असणार्या विकासासाठी शिवसेना कटिबध्द आहे. या श्री क्षेत्र पेंडगावच्या भूमीची सेवा करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य समजतो. श्री हनुमंतरायांच्या कृपेने मी तुमच्या भागात आज 50 लक्ष रु.च्या विकास निधीची कामे सुरु झाली आहेत. पेंडगाव मधील गाव अंतर्गत सिमेंट रस्ते हे दर्जेदारपणे पध्दतीने होणार आहेत. मंदिर परिसरात सुध्दा आपण पेव्हर ब्लॉक टाकून भक्तांना येण्यासाठी सुविधा करणार आहोत. जिल्हा परिषद शाळेतील खोल्यांची ही दुरुस्ती होणार आहे. येणार्या काळात विकासाची कामे अशीच वेगवान पध्दतीने सुरु राहतील यात कोणालाही शंका असू नये. विकासासाठी तुम्ही शिवसेनेला साथ द्या आणि कमी पडणार नाहीत असा विश्वास जिल्हाप्रमुख खांडे यांनी व्यक्त केला. या प्रसंगी पेंडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS