पंढरपूर प्रतिनिधी - सोलापूर जिल्ह्यातील करकंब पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्

पंढरपूर प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यातील करकंब पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार प्रशांत परिचारक , कोल्हापूर परीक्षेतराचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी , पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे ,अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपाधीक्षक विक्रम कदम उपस्थित होते. ग्रामीण भागातील २३ गावांच्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे पोलीस ठाणे कार्यरत असणार आहे. असा विश्वास मंत्री विखे – पाटील यांनी व्यक्त केला. राज्यात कुठेही बदलाचे वारे नाहीत. उगाच भविष्यकार होऊन रस्त्याच्या कडेला पोपट घेऊन बसणाऱ्यांची उपासमार करू नका. परिवर्तनाचे स्वप्नरंजन करू नका. असा शरद पवार यांना टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. सोलापूर जिल्ह्यातील करकंब येथील पोलीस ठाण्याच्या उद्घाटनासाठी राधाकृष्ण विखे पाटील आले होते. प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे ,माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते. तसेच राज्यात सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये इन्कमिंग सुरू आहे. इतर कुठल्याही पक्षात इन्कमिंग नाही. त्यामुळे शरद पवार साहेब इन्कमिंग नसताना कोणाच्या जीवावर परिवर्तनाच्या गोष्टी करत आहेत. यांचे आश्चर्य वाटते. तसेच संजय राऊत यांच्या बाबत प्रश्न विचारतात ‘कोण संजय राऊत’ असा उपरोधिक प्रश्न देखील मंत्री विखे पाटील यांनी केला. चालू अधिवेशनात खडी व वाळू बाबत नवीन धोरण सरकार जाहीर करणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशी वाळू – खडी लवकरच मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
COMMENTS