Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते इंडसइंड बँकेच्या शाखेचा शुभारंभ

लातूर प्रतिनिधी - इंडसइंड बँकेच्या नव्याने सुरु होत असलेल्या शाखेमधून ग्राहकांना तत्पर सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करुन इंडसइंड बँकेच्या माध्य

शिर्डीतील 4 मालकांवर पिटा अंतर्गत कारवाई
दुर्दैवाने निकाल विरोधात आला तर देशभरातील ओबीसींना अडचणी – भुजबळ | LOKNews24
शिवसेना भवनासमोर मनसेकडून हनुमान चालीसा

लातूर प्रतिनिधी – इंडसइंड बँकेच्या नव्याने सुरु होत असलेल्या शाखेमधून ग्राहकांना तत्पर सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करुन इंडसइंड बँकेच्या माध्यमातून येथील उद्योग व्यापाराबरोबर लातूरच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
लातूर शहरातील कामदार रोड येथील पहिल्या इंडसइंड बँक शाखेचा शुभारंभ दि. 18 ऑगस्ट रोजी दुपारी राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव-रमेश बियाणी, चार्टड अकाऊंटंट प्रकाश कासट, इंडसइंड बँकेचे सोलापूर विभाग प्रमुख- सतीश कुंकरे, मॅनेजर संदीप सरवदे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, मनपाचे माजी नगरसेवक कैलास कांबळे, युनूस मोमीन, नागसेन कामेगावकर, दत्ता सोमवंशी, बाभळगाव ग्रामपंचायत उपसरपंच गोविंद देशमुख, अभिषेक पतंगे, अ‍ॅड. गोपाळ बुरबुरे आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, इंडसइंड बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS