केज प्रतिनिधी - केज शहरातील बीड रोड वरील मौजन कॉम्प्लेक्स येथे भारतीय पीक विमा कंपनीचे शेतकरी सुविधा केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले आहे.या कार्यक
केज प्रतिनिधी – केज शहरातील बीड रोड वरील मौजन कॉम्प्लेक्स येथे भारतीय पीक विमा कंपनीचे शेतकरी सुविधा केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक केज तालुका कृषी अधिकारी एस.एस. पठाडे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी मंडळ अधिकारी व्ही.बी.अंभोरे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एन. एम. येवले,श्रीमती व्ही.व्ही. कदम,वाघमारे साहेब, पी.सी.कोठावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय पिक विमा शेतकरी सुविधा केंद्राचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.यावेळी भारतीय पिक विमाकंपनी केज शाखेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. केज तालुका कृषी अधिकारी पठाडे साहेब यांनी शेतकर्यांच्या विविध अडचणीवर पिक विमा कंपनीच्या कर्मचार्यांना सखोल मार्गदर्शन केले. या शेतकरी सूविधा केंद्रा मध्ये केज तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या पिक विम्याच्या संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी व सविस्तर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय पिक विमा कंपनीने शेतकरी सुविधा केंद्र चालू केले आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राम तारळकर यांनी मानले.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्या साठी भारतीय विमा कंपनीचे राहुल चौरे व काशिनाथ सामसे यांनी अथक परिश्रम घेतले. तरी केज तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या पीक विम्याच्या संदर्भात काही अडचणी असतील तर शेतकरी बांधवांनी या केंद्राशी संपर्क करून अडचणी सोडवाव्यात असे आवाहन भारतीय विमा कंपनीचे केज तालुका प्रतिनिधी एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी केले आहे.
COMMENTS