नेवासाफाटा प्रतिनिधी - नेवासा तालुक्यातील 13 गावच्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून खर्या अर्थाने निवडणूक ला रंग चढलेला बघायला

नेवासाफाटा प्रतिनिधी – नेवासा तालुक्यातील 13 गावच्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून खर्या अर्थाने निवडणूक ला रंग चढलेला बघायला मिळत आहे, त्यापैकी एक हंडीनिमगाव. हंडीनिमगाव मधील गावकरी ग्रामविकास पॅनलच्या वतीने आज प्रचार नारळ शुभारंभ झाला. नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव गावाला इतिहास आहे गावात अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील बाराव आहे, स्वयंभू त्रिवेणीश्वराचे प्राचीन मंदिर देखील आहे. सोमवारी गावचे ग्रामदैवत मारुती मंदिरा पासून प्रचार नारळ फोडून शुभारंभ झाला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कोरोना काळात आणि अगदी मागच्या आठवड्यात देवाघरी निघून गेलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली गेली.मागच्या पंचवार्षिक प्रमाणे या ही वर्षी जनतेतून थेट सरपंच पदाची निवडणूक असल्याने जनता ठरवणार तो सरपंच होणार असा कौल एकंदरीत दिसून येत आहे. गावातील राजकारण सरळ सरळ आहे गावातील लोकांनी गावासाठी केलेला गावकरी ग्राम विकास पॅनल चे सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार योगिता कुणाल पिसाळ वार्ड क्र.1 मधून नितीन भास्कर कांबळे, अलका राजेंद्र वाघमारे,ै प्रतीक्षा किरण जाधव, वार्ड क्र.2 मधून अमोल अशोक नवथर,सुनीता भास्कर कांबळे आणि वार्ड क्र.3 मधून बाळासाहेब शिवाजी पिसाळ,अनिल शंकर वरे व संगीता नवनाथ पिटेकर असे उमेदवार गावकरी ग्रामविकास पॅनल यांनी उभे केलेले आहे. गावकर्यांनी ठरवले आहे की आपल्या गावातील व्यक्तीच सरपंच असावा,बाहेर गावातून आलेल्या व्यक्ती ला सरपंच होऊ द्यायचे नाही असा एक पणच आखलेला दिसतो याचा प्रत्यय मागच्या पंचवार्षिक ला गावकरी ग्रामविकास पॅनलने दाखवला होता आज च्या कार्यक्रम प्रसंगी अॅडव्होकेट कल्याण राव पिसाळ,बाळासाहेब साळुंके, खिलारे, प्रभाकर कांबळे, बाळासाहेब जावळे, बाळासाहेब जाधव, यांनी मनोगत व्यक्त करून गावकरी ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवार यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आव्हान केले. या कार्यक्रमाला अरुण उंडे पा.संपतराव पिसाळ, अशोक पिसाळ, आबा तात्या साळुंके,मच्छिंद्र साळुंके शिवाजी साळुंके, बाळासाहेब उन्हाळे, बाबासाहेब रोडगे दिनकर कांबळे, पप्पू कांबळे, पवार सर,पोपटराव भणगे,पिटेकर कंडक्टर, रामभाऊ धनाळे, पिटेकर विठ्ठल,जाधव मनोहर, रोडगे मेजर साईनाथ ग्रुपचे सदस्य, त्रिवेणी श्वर मित्र मंडळ, मुळाइ माता ग्रुपचे सदस्य जालिंदरनाथ तरुण मंडळ समस्त मतदार बंधू भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS