कोपरगाव : नगरपरिषदेच्या वतीने गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहरातील विविध चौकांच्या सुशोभीकरण कामांचे लोकार्पण नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. तहसील मैदान, कोपरगाव येथे आयोजित या कार्यक्रमात तहसील मैदान कॉर्नर, श्री साईबाबा कॉर्नर तसेच गोदावरी तीर परिसरातील सुशोभीकरण कामांचे उद्घाटन करण्यात आले. आपले कोपरगांव, वेलकम कोपरगांव, नमामी गोदावरी असे नामफलक लावण्यात आले आहेत. शहराच्या सौंदर्यात भर घालण्याच्या दृष्टीने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना अधिक स्वच्छ, आकर्षक व सुबक वातावरणाचा अनुभव मिळणार आहे. चौकांचे सुशोभीकरण, प्रकाशयोजना, स्वच्छता आणि सुटसुटीत रचना यामुळे शहराच्या एकूणच प्रतिमेत सकारात्मक बदल होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमादरम्यान बोलताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी जुन्या प्रलंबित प्रश्नांमुळे काहीसा वेळ लागतो आहे पण आता थांबायचं नाही, तर काम करून दाखवणार असा ठाम मनोदय व्यक्त केला. कोपरगाव शहर अधिक सुंदर, आधुनिक आणि प्रगत करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असून विकासकामांना सातत्याने गती देण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गट नेते प्रसाद आढाव, बांधकाम सभापती निलोफर फिरोज पठाण,राजेंद्र सोनवणे,अमोल अजमेरे,अतुल काले,बबलूशेठ वाणी,वैभव आढाव,अनिल आव्हाड, रवींद्र कथले,मेहमूद सय्यद,स्वप्निल मंजुळ, संतोष शिंदे, संजय उदावंत,वैभव गिरमे, कैलास मंजुळ, दत्तू पगारे, सोमनाथ म्हस्के, सनी वाघ, फिरोज पठाण, निसार शेख, आबा नरोडे,रोहित कणगरे,अक्षय अजमेरे, बांधकाम अभियंता सागर मोटे,स्वप्निल जाधव, निलेश बुचकुले, रोहिदास पाखरे आदींसह नगरसेवक,अधिकारी,पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

कोपरगाव : नगरपरिषदेच्या वतीने गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहरातील विविध चौकांच्या सुशोभीकरण कामांचे लोकार्पण नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. तहसील मैदान, कोपरगाव येथे आयोजित या कार्यक्रमात तहसील मैदान कॉर्नर, श्री साईबाबा कॉर्नर तसेच गोदावरी तीर परिसरातील सुशोभीकरण कामांचे उद्घाटन करण्यात आले. आपले कोपरगांव, वेलकम कोपरगांव, नमामी गोदावरी असे नामफलक लावण्यात आले आहेत.
शहराच्या सौंदर्यात भर घालण्याच्या दृष्टीने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना अधिक स्वच्छ, आकर्षक व सुबक वातावरणाचा अनुभव मिळणार आहे. चौकांचे सुशोभीकरण, प्रकाशयोजना, स्वच्छता आणि सुटसुटीत रचना यामुळे शहराच्या एकूणच प्रतिमेत सकारात्मक बदल होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान बोलताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी जुन्या प्रलंबित प्रश्नांमुळे काहीसा वेळ लागतो आहे पण आता थांबायचं नाही, तर काम करून दाखवणार असा ठाम मनोदय व्यक्त केला. कोपरगाव शहर अधिक सुंदर, आधुनिक आणि प्रगत करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असून विकासकामांना सातत्याने गती देण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गट नेते प्रसाद आढाव, बांधकाम सभापती निलोफर फिरोज पठाण,राजेंद्र सोनवणे,अमोल अजमेरे,अतुल काले,बबलूशेठ वाणी,वैभव आढाव,अनिल आव्हाड, रवींद्र कथले,मेहमूद सय्यद,स्वप्निल मंजुळ, संतोष शिंदे, संजय उदावंत,वैभव गिरमे, कैलास मंजुळ, दत्तू पगारे, सोमनाथ म्हस्के, सनी वाघ, फिरोज पठाण, निसार शेख, आबा नरोडे,रोहित कणगरे,अक्षय अजमेरे, बांधकाम अभियंता सागर मोटे,स्वप्निल जाधव, निलेश बुचकुले, रोहिदास पाखरे आदींसह नगरसेवक,अधिकारी,पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS