Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील 50 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ

अहमदनगर ः  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून  जिल्ह्यातील 50 महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ ऑनलाईन

कोंथिंबिर उत्पन्नातुन शेतकरी झाला लखपती (Video)
*तुमचे आजचे राशीचक्र शुक्रवार, ११ जून २०२१ l पहा LokNews24*
जवळा ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला

अहमदनगर ः  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून  जिल्ह्यातील 50 महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग विळदघाट येथील जिल्हास्तरीय कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी सुनिल शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे बालाजी बिराजदार, ग्रामोद्योग अधिकारी बी.आर. मुंडे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. उदय नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कौशल्यावर आधारित शिक्षणाला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्यावर आधारित शिक्षण घेत जीवनात यश संपादन करावे. महाविद्यालयीन शिक्षणासह विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्यावर आधारित प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात युवक-युवतींना सक्षम बनविण्यासाठी महाविद्यालयामध्ये सुरू केलेले कौशल्य विकास केंद्र अतिशय महत्वाची भूमिका बजावतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील अकोले तालुक्यात 3 प्रशिक्षण केंद्र, कर्जत 2, कोपरगाव 6, अहमदनगर 11,नेवासा 2, पारनेर 2, पाथर्डी 4, राहाता 13, राहुरी 4, शेवगाव 2, श्रीगोंदा 3, श्रीरामपूर 1, संगमनेर 2  आणि जामखेड येथे एक अशा 50 महाविद्यालयातुन सुरू होत असलेल्या या केंद्रांमधुन 8 हजार 250 विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाणार असल्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी प्रधानमंत्री विश्‍वकर्मा योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सहा प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व विश्‍वकर्मा कार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रवेश नोंदविण्याचे आवाहन – या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 45 वयोगटातील इच्छुक युवक-युवतींनी संबंधित महविद्यालयांमध्ये रोजगार, स्वयंरोजगाराभिमुख अभ्यासक्रमांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता आपला प्रवेश नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे करण्यात आले आहे.

COMMENTS