मांगरुळ : कुस्ती मैदानात विजयी मल्ल सिकंदर शेख याच्या समवेत पंच. (छाया : आनंदा सुतार, खुजगांव.) शिराळा / प्रतिनिधी : चिंचेश्वर यात्रेनिमीत्त उत्क
शिराळा / प्रतिनिधी : चिंचेश्वर यात्रेनिमीत्त उत्कृष्ट असे कुस्ती मैदान पार पडले. या मैदानात अत्यंत प्रेक्षणिय लढती कुस्ती शौकिनांना पहावयास मिळाल्या प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. सिकंदर शेख विरूध्द पै. मोनुसिंग यांच्यात डाव प्रतिडाव करत सिकंदरने बाजी मारली.
त्याच बरोबर नंबर दोनची कुस्ती विकास पाटील विरूध्द राकेशकुमार यांची अतिशय अती तटीची झाली. यामध्ये विकास याने राकेश कुमार याला अस्मान दाखविले. त्याच बरोबर अमर पाटील विरूध्द प्रदिप ठाकूर अत्यंत प्रेक्षनिय कुस्ती करत अमर पाटील याने विजय मिळविला. मैदानातील इतर विजयी मल्ल असे अक्षय शिंदे, सुमित खांडेकर, दत्ता बनकर, सागर सुरवसे, इंद्रजित मोरे, शुभम शेणवी, ओमकार जाधव, संकेत शेणवी, धिरज पाटील, संकेत मस्के, सुरज पाटील, विवेक लाड, सुरज कुंभार, ऋतुराज मासाळ, विकास मोरबळे, राहुल जाधव, ओम शेवाळे, आदित्य मस्के, गणेश पवार, अभिजित पाटील, अक्षय पावले, सम्राट शिंदे, गोरख पाटील, ओमकार पाटील, रोहित पाटील, राहुल माने, पृथ्वीराज पाटील, अभिजित पाटील, प्रतीक पाटील, ओम पाटील, गौरव साळुंखे, साहिल शिंदे. पंच म्हणून श्रीरंग बोरगे, सर्जेराव बोरगे, विजय मस्के, धनाजी खांडेकर, जयसिंग शेणवी, अमर मस्के, वैभव गायकवाड, संजय गायकवाड, अजित पाटील, जालिंदर शेणवी, संजय खांडेकर, अरविंद पाटील, सचिन मस्के, रामराव पाटील, अमित शेणवी, किरण खांडेकर, जितेंद्र मस्के, सुनिल शिंदे, महेंद्र शेणवी यांनी काम पाहिले. मैदानाचे उतकृष्ठ असे समावलोचन निवेदक पै. सुरेश जाधव चिंचोलीकर तर हालगी वादन मारुती मोरे कागल यांनी केले.
COMMENTS