Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या समुद्रात निंबाळकरांनी वेगळेपण जोपासले-जिल्हाधिकारी

बीड प्रतिनिधी - जिल्हा परिषद म्हणजे एक समुद्र आहे येथे काम करणे तितकेसे सोपे नाही त्यातला त्यात जलसंपदा विभाग, लघु पाटबंधारे विभागात तक्रार न हो

ताई महोत्सवानिमित्त 11 ते 15 ऑगस्ट दरम्यान
घोडेगावच्या पाणी टाकीच्या जागेचा निर्णय ग्रामसभेतच होणार
सिद्धीबागेतील मासा झाला जिवंत..अन..हसरा… तीन दिवसात झाले नूतनीकरण, दानशुरांनी केली मदत

बीड प्रतिनिधी – जिल्हा परिषद म्हणजे एक समुद्र आहे येथे काम करणे तितकेसे सोपे नाही त्यातला त्यात जलसंपदा विभाग, लघु पाटबंधारे विभागात तक्रार न होता निर्विवादपणे सेवा निवृत्ती मिळवणे यातुनच निंबाळकरांनी आपले वेगळेपण हे आपल्या कामातून जोपासल्याचे स्पष्ट होते असे मत सेवानिवृत्तीच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी व्यक्त केले.
बीड जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा जलसंधारण अधिकारी को.मा.निंबाळकर यांना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्ती देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके तसेच जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण अधिकारी चंद्रशेखर केकान, जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे, नरेगाचे सचिन सानप, प्रशासन अधिकारी राहुल कांबळे, सत्कारमुर्ती जिल्हा जलसंधारण अधिकारी को.मा. निंबाळकर त्यांच्या सुविद्य पत्नी राष्ट्रवादीच्या प्रदेशउपाध्यक्ष कमलताई निंबाळकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष वैभव स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलतांना दीपा मुंडे म्हणाल्या, शेतकर्यांच्या भूसंपादनाचे पैसे जिल्हा महसुल विभागाकडे तांत्रिक बाबीमध्ये अडकले होते. मात्र माझ्या शेतकर्यांना त्यांच्या हक्काचा पैसा शासनाकडून आलेला आहे तो प्रशासनाच्या कायदेशीर कचाट्यातुन मिळावा यासाठी त्यांनी चिकाटीने प्रयत्न केले. प्रसंगी माझ्याशी वाद घातला यातुनच त्यांची कामावरची निष्ठा आणि शेतकर्यांबद्दलची तळमळ दिसून येते असे अधिकारी बीड जिल्ह्याला लाभले म्हणून निश्चीतच या जिल्ह्याच्या विकासात भर पडली. ते जरी सेवानिवृत्ती होत असले तरी भविष्यात प्रशासनाला जेंव्हा केंव्हा गरज पडेल तेंव्हा त्यांनी आपले योगदान द्यावे. त्यांनी आपले मुले उच्चशिक्षीत घडवले हे केवळ संस्कारातुनच होते असे मत व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके म्हणाले, निंबाळकर यांना जिल्हा परिषदेमध्ये राजे म्हणूनच संबोधतात, त्यांच्याबद्दल साधी एकही तक्रार कधी आली नाही. बीड जिल्ह्याला पर्यटनाचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील असे मत व्यक्त केले. सत्कारमुर्ती को.मा.निंबाळकर यांनी मी अगदी प्रतिकुल परिस्थितीतुन या उंचीपर्यंत येवू शकला ते केवळ माझे गुरूजन, माझे मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट आणि कुटूबींय तसेच मला लाभलेले अधिकारी  त्यांचे मार्गदर्शन आणि माझ्या समवेत समविचाराने काम करणारा मिळालेला स्टाफ यामुळे अगदी आनंदाने नौकरी ही सेवा म्हणून करत आली. आज जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत माझी सेवानिवृत्ती होत आहे हे माझे भाग्य समजतो असे मनोगत व्यक्त करतांना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल कांबळे यांनी केले तर सेवानिवृत्तीच्या सोहळ्याला कुटूंबीय, जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी वृंद मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS