Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरपालिका वाचनालयात डॉ. हेडगेवार यांची जयंती उत्साहात

कोपरगाव शहर ः कोपरगाव येथील नगरपरिषदचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम सरसंघचालक परमपूज्य डॉ.

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्य जनतेची लूट
विकास थांबवणारा तुमचा लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही ः डॉ. सुजय विखे
गणेशोत्सवासाठी कोपरगाव पोलिसांनी घेतली शांतता समितीची बैठक

कोपरगाव शहर ः कोपरगाव येथील नगरपरिषदचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची तिथीनुसार 135 वी जयंती निमित्ताने माजी सैनिक सुभेदार मारुतीराव कोपरे, सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अशोकराव टुपके यांचे शुभहस्ते डॉ. केशव हेडगेवार यांच्या नवीन प्रतिमेचे पूजन करत साजरी करण्यात आली.
कोपरगाव नगरपरिषदचे सार्वजनिक वाचनालयात जुनी इमारत असतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे सह लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले यांचे तैलचित्र होते. नवीन ईमारत बांधकाम झालेवर त्या ठिकाणी पुर्वीच्या प्रतिमा पुर्नस्थापित करणेबाबत स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते. कोपरगांव नगरपरिषदचे दखल घेत मुख्याधिकारी सुहास जगताप, उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांनी तातडीने डॉ. हेडगेवार यांची प्रतिमा पुर्नस्थापित केली आहे. या प्रतिमेचे पुजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपूर्ण विश्‍वात संघटनात्मक आणि सर्मर्पित राष्ट्रीय कार्य प्रेरणादायी आहे.  या प्रसंगी वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक विजय गुरव, विजय जोशी, नरेंद्र डंबीर, सुरेश कांगुणे, तालुका कार्यवाह निलेश जाधव, उपखंड प्रमुख वैभव राजगुरू, सुशांत खैरे, ललित ठोंबरे, सतिष चव्हाण, यांचे सह वाचनालयातील कर्मचारी, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर ज्येष्ठ स्वयंसेवक विजय जोशी यांनी डॉ. केशव हेडगेवार यांचे विषयी माहिती दिली. तर रवींद्र निकम यांचे समवेत सामुदायिक प्रार्थना झाली. सुत्रसंचालन स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले.

COMMENTS