Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालिका निवडणुकीत मुस्लिमसह बहुजन समाजाने नामांतरणाचे राजकारण नाकारले : शाकिर तांबोळी

ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : उरूण-ईश्‍वरपूर नगरपालिकेच्या निकालानंतर महायुतीने केलेले विश्‍लेषण हे अर्धसत्यावर आधारित आणि आत्मपरीक्षण टाळणारे आहे. ईश्‍वरप

मालकाचा विश्वास संपादन करून चोरी करणाऱ्या टोळीला अटक | LOKNews24
केंद्राच्या श्रम नीती धोरणात संविधान विरोधी मनुस्मृती !
सुदृढ शरीरातूनच उत्तम प्रशासन घडेल : जलसंपदा मंत्री महाजन

ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : उरूण-ईश्‍वरपूर नगरपालिकेच्या निकालानंतर महायुतीने केलेले विश्‍लेषण हे अर्धसत्यावर आधारित आणि आत्मपरीक्षण टाळणारे आहे. ईश्‍वरपूर नामांतरणामुळे मुस्लिम समाज नाराज झाला असे सांगणे म्हणजे या निकाला मागील व्यापक सामाजिक संदेशाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करणे. नामांतरणाच्या राजकारणाला फक्त मुस्लिम समाजानेच नाही, तर बहुजन समाजानेही स्पष्ट नकार दिला असल्याचे महाराष्ट्र संघर्ष समितीचे अध्यक्ष शाकिर तांबोळी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले.
शाकिर तांबोळी म्हणाले, बहुजन, प्रगतशील हिंदू समाज, व्यापारी, कामगार, मध्यमवर्ग, शांतता, सलोखा आणि विकासाला प्राधान्य देणारे नागरिक या सर्व घटकांनी धार्मिक-ओळख केंद्रित राजकारणापेक्षा शहराच्या मूळ ओळखीची बाजू घेतली आहे.
मुस्लिम समाजाने महायुतीला नाकारले हे विश्‍लेषण अपूर्ण, एकांगी आणि दिशाभूल करणारे आहे. जर नामांतरण खरोखर स्वीकारले गेले असते तर त्यावर निवडणुकीत स्पष्ट जनसमर्थन दिसले असते. शहराने नाव बदलण्यापेक्षा शहराची संस्कृती, सलोखा आणि समता वाचवण्याला पसंती दिली आहे. ईश्‍वरपूर नगरपरिषदेचा 117 वर्षांचा इतिहास हा सामाजिक सलोख्याचा इतिहास आहे. या शहरात कधीही धर्म किंवा जातीच्या आधारावर सत्तासंघर्ष झाला नाही. हा शांत प्रवाह सन 2016 नंतर बदलण्याचा प्रयत्न झाला आणि तिथूनच समस्या सुरू झाल्या. नगरपालिकेची सत्ता मिळाल्यानंतर अनावश्यक जातीय मुद्दे पुढे आणले गेले. धार्मिक भावनांना हात घालणारे मोर्चे काढले गेले. विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणारे प्रतीकात्मक उपक्रम राबवले गेले. सार्वजनिक भाषणांतून सामाजिक तेढ वाढवणारी वक्तव्ये झाली. यामुळे मुस्लिम समाजच नव्हे, तर बहुजन आणि पुरोगामी हिंदू समाजही अस्वस्थ झाला.

COMMENTS