Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पहाटेच्या थंडीत शेकडो स्पर्धक औंध हिल मॅरेथॉनमध्ये धावले

औंधकरही मोठ्या उत्साहात धावले; 600 स्पर्धकांचा सहभागऔंध / वार्ताहर : येथील श्री यमाई देवी यात्रेनिमित्त येथील राजयोग फाऊंडेशनने आयोजित केलेल्या

महाबळेश्‍वर येथील पर्यटन विकास कामांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून आढावा
युगांडात अंध मुलांच्या शाळेला भीषण आग; 11 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू
शामगाव येथे पिण्याच्या पाण्याचे एटीएम

औंधकरही मोठ्या उत्साहात धावले; 600 स्पर्धकांचा सहभाग
औंध / वार्ताहर : येथील श्री यमाई देवी यात्रेनिमित्त येथील राजयोग फाऊंडेशनने आयोजित केलेल्या औंध हिल मॅरेथॉन स्पर्धेला राज्यभरातील स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये सुमारे 600 स्पर्धकांनी सहभाग घेतला. अतिशय उत्साहात औंध हिल मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या. 11 कि. मी. अंतराबरोबरच तीन किमी अंतराची फन मॅरेथॉन स्पर्धा ही यावेळी आयोजित करण्यात आली होती.
रविवारी सकाळी औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी, यझदीबाबा, डॅनीबाबा, अमरशेठ देशमुख, योगेश फडतरे, अनिल जाधव, हणमंतराव शिंदे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.
अकरा किमी अंतर असलेल्या या स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या. यामध्ये 18 ते 34 वयोगटामध्ये किशोर नारायण शिंदे यांनी सेंकदात प्रथम क्रमांक पटकावला. या गटात द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे ऋषिकेश सपकाळ, यशवंत हिरवे यांनी तर 18 ते 34 वयोगटात महिलांमध्ये प्रथम क्रमांक पहिले तीन क्रमांक अनुक्रमे आकांक्षा शेलार, शितल सपकाळ, प्रज्ञा पाटोळे यांनी पटकाविले.
35 ते 49 पुरूष वयोगटामध्ये पहिले तीन क्रमांक अनुक्रमे मल्लिकार्जुन परदे, पवन प्रजापती, श्रीनिवास पांडे यांनी तर या गटात महिला विभागात पहिले तीन क्रमांक अनुक्रमे स्मिता शिंदे, दिपाली किर्दत, पूनम दिघे यांनी तर 50 पेक्षा जास्त वयोगटात पुरूषांमध्ये पहिले तीन क्रमांक अनुक्रमे रमेश चिवीलकर, रवींद्र जगदाळे, पांडुरंग पाटील यांनी तर याच गटात महिला विभागात पहिले तीन क्रमांक अनुक्रमे अनिता पाटील, संगीता उबाळे, साधना धनावडे यांनी पटकाविले.
या गटात बालगोपाळांसह, युवक, युवती ज्येष्ठ नागरिक, महिलांनी ही सहभाग घेतला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी, यसदी बाबा, डॅनी सर, योगेश फडतरे, संदीप मांडवे हणमंतराव शिंदे, अमर देशमुख, सौ. सविता देशमुख, शुभम शिंदे, अनिल जाधव, सपोनि गणेश वाघमोडे, प्रशांत खैरमोडे, नवल थोरात, संजय निकम, सुधाकर कुमकर आदी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
स्पर्धेचे नेटके नियोजन अमर देशमुख, हर्षद देशुमख, बाबाराजे नांदुगडे, तानाजी इंगळे, शंभूराजे देशमुख, प्रशांत जाधव, सचिन चव्हाण, पृथ्वीराज देशमुख, प्रमोद कोळी, बापू आमले, सुरज देशमुख, प्रशांत इंगळे, प्रणव वसव, आशिष देशमुख, अनिकेत देशमुख, मयूर रणदिवे, प्रशांत इंगळे, रमेश यादव, इंद्रजीत देशमुख, यश नांदुगडे, निमेश कंठाळे, धीरज इंगळे, अक्षय हजारे, संभाजी कुंभार, प्रवीण इंगळे, अक्षय रणदिवे यांनी केले. विशेष सहकार्य डॉ. दयानंद घाडगे सातारा, डॉ. सोमनाथ काटकर पुसेगाव, डॉ. महेश काटकर वडूज, मुंबई ग्रुप रत्नाकर शेट्टी, सचिन सांगळे, सुनील मोहिते, सुनील परब, श्रीकांत सावंत यांनी केले. हिंदुस्थान कॉ. सोसायटी मुंबई व औंधमधील सर्व शैक्षणिक संस्थांच्या कर्मचार्‍यांनी ही विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS