Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यात…राष्ट्रवादी पुन्हा… सर्वाधिक 83 ग्रामपंचायतींवर सरपंच,

वंचित, प्रहार व शिंदे गटाचे उघडले खाते

अहमदनगर/प्रतिनिधी ः आवाज जनतेचा दाही दिशांतून घुमला...राष्ट्रवादी पुन्हा...गाणे मंगळवारी (20 डिसेंबर) जिल्हाभर जोरात वाजत होते व निमित्त होते- ज

राहत्यात एका सरपंचासह 25 सदस्य बिनविरोध
राहुरीत 11 सरपंचांसाठी 88 उमेदवारांचे गुडघ्याला बाशिंग !
ग्रामपंचायत निवडणूक तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरवात 

अहमदनगर/प्रतिनिधी ः आवाज जनतेचा दाही दिशांतून घुमला…राष्ट्रवादी पुन्हा…गाणे मंगळवारी (20 डिसेंबर) जिल्हाभर जोरात वाजत होते व निमित्त होते- जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 83 ग्रामपंचायतीतील सरपंचपदे पटकावून राष्ट्रवादीने मिळवलेल्या वर्चस्वाचे आणि अर्थातच दुसर्‍या क्रमांकावर 59 जागी सरपंचपदे मिळवणारा भाजप आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून 127 सरपंचपदे पटकावली आहेत व विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती व बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांच्या शिवसेनेने प्रत्येकी 1 सरपंचपदे पटकावून ग्रामीण राजकारणात खाते उघडले आहे.

मतमोजणी झालेल्या 203 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी नंबर वन असल्याचा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फळके यांनी केला आहे. यावेळी जनतेतून सरपंच निवडायचा असल्याने या पदासाठी चुरस होती. या पार्श्‍वभूमीवर, जिल्ह्यात 203 ग्रामपंचायतींपैकी 83 ठिकाणी राष्ट्रवादीचे सरपंच विराजमान झाल्याची माहिती फाळके यांनी दिली. तर दुसर्‍या स्थानावर भाजपचे 59 सरपंच असून काँग्रेसला 28 ठिकाणी तर शिवसेनेतील उध्दव ठाकरे गटाला 16 ठिकाणी सरपंच पदे मिळ्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेतील मुख्यमंत्री शिंदे गटाला पारनेर तालुक्यात एका ठिकाणी, वंचित बहुजन आघाडीला पाथर्डी तालुक्यात एका ठिकाणी तर प्रहार जनशक्ती पक्षाला पाथर्डी तालुक्यातच एका ठिकाणी जनतेतून सरपंचपद मिळाले. याशिवाय श्रीरामपूरला माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाला दोन आणि मुरकुटे व ससाणे गटाला एक, नेवाशाला गड़ाख-घुले गटाला एक तर राहुरीला विखे-तनपुरे गटाला एकाजागी सरपंचपद मिळाले आहे. अपक्षांनी आठ ठिकाणी सरपंचपदे पटकावली आहेत.

ग्रामपंचायत निकालानंतर राष्ट्रवादीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात राष्ट्रवादीला सर्वाधिक 83 सरपंच पदे मिळाली आहेत. त्याखालोखाल भाजप 59, काँग्रेस 28, उध्दव ठाकरे यांची शिवसेना 16, शिंदे शिवसेना 1 आणि अन्य 9, तर अपक्ष 7 असे सरपंच झाले आहेत. अन्यमध्ये झालेल्या सरपंचांमध्ये स्थानिक आघाडी, शेवगावमधील जनशक्त मंच आणि पाथर्डीतील वंचित बहुजन आणि प्रहार यांचा समावेश आहे.

तालुकानिहाय पक्षीय ताकद – अकोले ः 11 सरपंच पदांपैकी 10 राष्ट्रवादी आणि भाजप 1.

– संगमनेर ः 37 सरपंचां पैकी काँग्रेस 27, भाजप 9 आणि 1 अपक्ष.

– कोपरगाव ः 26 सरपंचां पैकी 15 राष्ट्रवादी, ठाकरे सेना 1, भाजप 9 आणि अपक्ष 1.

– श्रीरामपूर ः  6 सरपंचां पैकी राष्ट्रवादी 2, मुरकुटे गट 2, मुरकुटे आणि ससाणे गट 1 आणि अपक्ष 1.

– राहाता ः 12 सरपंचां पैकी भाजप 11 आणि राष्ट्रवादी 1.

– नेवासा ः 13 सरपंचां पैकी 12 ठाकरे शिवसेना(गडाख) आणि गडाख आणि घुले गट 1.

– शेवगाव ः 12 सरपंचां पैकी 8 राष्ट्रवादी, भाजप 3 आणि जनशक्ती 1.

– नगर ः 27 सरपंचां पैकी 12 राष्ट्रवादी, 14 भाजप अन्य 1.

– पारनेर ः 16 सरपंचां पैकी 13 राष्ट्रवादी, 2 ठाकरे सेना, 1 शिंदे सेना.

– श्रीगोंदा ः 10 सरपंचां पैकी 6 राष्ट्रवादी, 1 काँग्रेस, 3 अपक्ष.

– कर्जत ः 8 सरपंचां पैकी 2 राष्ट्रवादी, 1 ठाकरे सेना, 5 भाजप.

– जामखेड ः 3 सरपंचां पैकी 2 राष्ट्रवादी आणि 1 भाजप.

COMMENTS