संगमनेर ( प्रतिनिधी ) मागील दोन वर्षाच्या कोरोना संकटांमध्ये महाविकास आघाडी सरकारने अत्यंत चांगले काम केले आहे. या सर्व संकट काळात विकासाचा वेग कायम
संगमनेर ( प्रतिनिधी ) मागील दोन वर्षाच्या कोरोना संकटांमध्ये महाविकास आघाडी सरकारने अत्यंत चांगले काम केले आहे. या सर्व संकट काळात विकासाचा वेग कायम राखला गेला असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून महाविकास आघाडी सरकार काम करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
चिखली येथे आढळा नदीवरील फरशी पुलाचा लोकार्पण व विविध रस्त्यांचे उद्घाटन नामदार थोरात यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते तर यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, सभापती सौ सुनंदाताई जोर्वेकर, सौ. मीराताई शेटे, जि.प सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे, मिलिंद कानवडे,कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, पांडुरंग पा.घुले, संपतराव डोंगरे, गणपतराव सांगळे, माजी सभापती सौ नीषाताई कोकणे,पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ, भास्करराव सिनारे,विनोद हासे, आत्माराम हासे, नंदू हासे, रोहिदास पवार आदींसह सरपंच,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकर्ते पदाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील उपस्थित होते.
यावेळी चिखली – केळेवाडी फरशी पुलाचे लोकार्पण, जि. प .प्राथमीक शाळा तीन खोल्यांचे लोकार्पण, चिखली वाडापूर डांबरीकरण रस्त्याचे लोकार्पण, मेमाने मळा रस्ता, चिखली जवळेकडलग डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन, प्राथमिक शाळा संरक्षण भिंतीचे भूमिपूजन, पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सोलर चा शुभारंभ, जलशुद्धीकरण आर.ओ .शुभारंभ, अंगणवाडीचे लोकार्पण यांचे विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. यावेळी बोलताना नामदार थोरात म्हणाले की, मागील दोन वर्षापासून कोरोना पाठोपाठ नैसर्गिक संकटे ही आली. मात्र महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे काम करत असून गोरगरिबांच्या विकासासाठी सातत्याने योजना राबवल्या आहेत. संकट काळ असला तरीही विकासकामांचा वेग कायम राखला आहे. संगमनेर तालुक्यात रस्त्यांच्या डांबरीकरणाची व मजबुतीकरणाचे जाळे विणले जात आहे. प्रवरा व आढळा नदीवर विविध ठिकाणी पुल झाले आहेत. त्यामुळे दळणवळणासाठी अधिक सोय होणार आहे. चिखली केळेवाडी मधील फरशी पुलाचे काम अत्यंत चांगले झाले असून कमी कालावधीत झाले आहे. यामुळे बारामही वाहतूक या पुलावरून होणार आहे. विकासाच्या अनेक योजना सुरू राहणार असून संगमनेर तालुका हा विकास कामांचे मॉडेल ठरला असल्याचे ते म्हणाले. तर आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे राज्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र संगमनेर तालुक्याच्या वाडी – वस्तीवर विकासासाठी ते काम करत आहेत. शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मिळून तालुक्यात नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत आहेत. निळवंडे धरणाच्या कालव्यांना त्यांनी अत्यंत गती दिली असून पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. तर जि.प सदस्य रामहरी कातोरे म्हणाले की, नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रजीतभाऊ थोरात यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषदेतून अनेक योजना मार्गी लागल्या आहेत. धांदरफळ गटामध्ये विविध गावांमध्ये रस्ते,अंगणवाडी खोल्या हे कामे मार्गी लागली आहेत. आढळा नदी वर फरशी फुलासह इतर पुलही निर्माण झाले आहेत. या विभागासाठी जास्तीत जास्त निधी मिळून कामे करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. या कामांमध्ये या भागातील जनतेची मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे ते म्हणाले.यावेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते
COMMENTS