Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतदारसंघामध्ये आ. रोहित पवारांच्या विचारांची वारी

कर्जत : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची मतदारसंघांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून स्वाभिमानी यात्रा सुरु आहे. ’वारी विचारांची... निष्ठावंतां

अ‍ॅमेझॉन देणार कर्जत-जामखेडच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण  
कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवारांचे आंदोलन
रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल

कर्जत : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची मतदारसंघांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून स्वाभिमानी यात्रा सुरु आहे. ’वारी विचारांची… निष्ठावंतांची…नव्या पर्वाची’ या टॅगलाईनखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत. गावागावांमध्ये जाऊन स्वच्छता अभियान, वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम घेतले जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारसंघातील या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.
या यात्रेच्या निमित्ताने शेकडो कार्यकर्ते हे आ. रोहित पवार यांनी मतदारसंघात केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर पक्षाला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिलेल्यांना स्वाभिमानाचे बिरुद लावत अधिकाधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आ. रोहित पवार यांनी राज्यभर दौरे करुन आपला प्रभाव निर्माण केला आहे. त्याचेच द्योतक म्हणून मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी संघटित होऊन सक्रियपणे ’स्वाभिमानी यात्रा’ काढली आहे. त्याचा मोठा परिणाम मतदारसंघातील जनतेवर होणार असल्याचे दिसत आहे.

COMMENTS