Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुखेड शहरात घाणीचे साम्राज्य,पाण्यासाठीही पायपीट, प्रशासनाचे दुर्लक्ष

मुखेड प्रतिनिधी - शहरातील सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहर

रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज
जळगावमध्ये कंटेनर उलटल्याने दोघांचा मृत्यू
सोलापूर विभागातील तिकीट निरीक्षकांचा गौरव

मुखेड प्रतिनिधी – शहरातील सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहरात सुध्दा पाणी टंचाई निर्माण होते ही प्रशासनासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.
मुखेड नगर पालिकेची मुदत संपली मात्र निवडणूका झाले नसल्यामुळे सध्या प्रशासक राज आहे. नगर परिषदेत केडरचे अधिकारी मुख्याधिकारी म्हणून असल्यास त्यांना शहरातील नागरिकांना द्यावयाच्या नागरी सुविधा, शहराच्या समस्या,प्रशासन आदी बाबींकडे लक्ष देण्यासाठी वेळ असतो, परंतु सध्या मुखेड नगर पालिकेत तहसील कार्यालयातील एका नायब तहसीलदार यांच्याकडे तात्पुरता पदभार दिला गेला आहे. त्यामुळे यांना पुर्णवेळ देता येत नसल्याने कर्मचार्‍यांवरील पकड ढिली झाली आहे. शहरात ठिकठिकाणी कचरा साचला असून दुर्गंधी पसरली आहे, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान मुखेड शहरातील शिवाजीनगर भागात पाणी टंचाई निर्माण झाली असून शहरातील नागरिकांना पाण्यासाठी हंडा घेऊन फिरावे लागत आहे. तेव्हा शासनाने पुर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा व विद्यमान अधिकारी, कर्मचार्‍यांनी शहरातील स्वच्छतेकडे लक्ष देऊन शहर स्वच्छ, सुंदर ठेवावे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

COMMENTS