अहमदनगर प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील पठार भागातील दुर्गम भागातील म्हसवंडी गावात सामाईक क्षेत्रातील कापलेल्या झाडांवर चुना टाकून परतत असताना
अहमदनगर प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील पठार भागातील दुर्गम भागातील म्हसवंडी गावात सामाईक क्षेत्रातील कापलेल्या झाडांवर चुना टाकून परतत असताना अचानक महिलेसह तिचे पतीस तिचा पुतण्या व इतर दोघांनी लाठ्या, काठ्या, शिगेने शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तीन जणांवर घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसवंडी गावातील अनिता दत्तात्रय बोडके व त्यांचे पती दत्तात्रय धोंडीभाऊ बोडके हे त्यांचे सामाईक शेतातील कापलेल्या झाडांवर चुना टाकून तेथून परतत असताना पुतण्या योगेश सखाराम बोडके, दिलीप सोपान बोडके,सखाराम धोंडीभाऊ बोडके यांनी तेथे येऊन शिवीगाळ केली.पुतण्या योगेश याने त्याचे हातातील शिगेने डोक्यात व हातावर मारहाण केली .व सखाराम यांनी काठीने तर दिलीप यांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.अनिताचे पती दत्तात्रय हे सोडविण्यास आले असता त्यांनाही योगेशने शिवीगाळ करत मारहाण केली.तर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे अनिता बोडके व सखाराम बोडके यांनी सांगीतले आहे.या दरम्यान अनिता बोडके व त्यांचे पती दत्तात्रय बोडके हे जखमी झाले असून अनिता बोडके या महिलेवर विघ्नहर हॉस्पिटल आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचे डोक्याला आठ टाके तर हाताला चार टाके पडले असून त्या गंभीर जखमी आहेत.
COMMENTS