Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात आरटीओ अधिकार्‍यानेच उडवले दोघांना

पुणे ः पुणे शहराचे वातावरण सध्या बिघडतांना दिसून येत आहे. कधी बड्या बापांची पोरं सर्वसामान्यांना दारूच्या नशेत उडवतांना दिसून येत आहे, तरा कुठे क

अज्ञात वाहनाच्या धडकेने दोघांचा मृत्यू
अखेर मुलीला शाळेत सोडणे राहूनच गेले…
मद्यधुंद मुख्याधिकार्‍यांनी उडवले दोन गाड्यांना

पुणे ः पुणे शहराचे वातावरण सध्या बिघडतांना दिसून येत आहे. कधी बड्या बापांची पोरं सर्वसामान्यांना दारूच्या नशेत उडवतांना दिसून येत आहे, तरा कुठे कोयता गँगचा धुमाकूळ तर कुठे दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्याचा प्रकार समोर येत असतांना आता आरटीओच्या एका अधिकार्‍यानेच दोघांना उडवल्याची घटना समोर आली आहे. आरटीओ अधिकार्‍यानेच दुचाकीला धडक देऊन केलल्या अपघातात अद्यापही कारवाई न झाल्यानंतर अपघातातील जखमींकडून संताप व्यक्त होत आहे. पुणे सोलापूर महामार्गावर विरुद्ध दिशेने जाणार्‍या एका चारचाकी गाडीने दुचाकीला धडक देऊन भीषण अपघाताची घटना घडली होती. वरळीतील हिट अँड रन प्रकरण देशभरात चर्चेत असतानाच, हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी हद्दीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या एका वरीष्ठ अधिकार्‍याने चुकीच्या दिशेने भरधाव वेगात गाडी चालवून दुचाकीला धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुंजीरवाडी गावातील चौकात हा अपघात घडला असून या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. संभाजी गावडे असे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍याचे नाव असून निखिल पवार आणि विकास राठोड असे अपघातात जखमी झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत.  विशेष बाब म्हणजे संभाजी गावडे यांनी दोन्ही जखमींच्या नातेवाईकांना उपचाराचा खर्च देण्याचे आमिष दाखवून, अपघाताचा गुन्हा लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल होऊ दिला नव्हता. मात्र, दोन्ही रुग्णांच्या शस्त्रक्रियांचा खर्च देण्यास साहेबांनी ऐनवेळी हात वर केल्याने, दोन्ही रुग्णांना उपचार संपल्यावरही मागील तीन दिवसापासुन रुग्णालयातच खितपत पडावे लागल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त ज्या दिवशी काही रस्ते बंद होते त्याच दिवशी हा अपघात घडल्याची माहिती आहे. संबंधित आर.टी.ओ. आधिकारी हे उरुळी कांचनच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. आरटीओ अधिकारी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने जात असताना समोरुन आलेल्या दुचाकीला या गाडीने जोरात धडक दिली होती. त्यामध्ये, निखिल पवार व विकास राठोड हे दोघेही जखमी झाले आहेत.

COMMENTS