Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये कोब्रानेच कोब्राला गिळले

नाशिक प्रतिनिधी - ही घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यातून समोर आली आहे. नांदगाव तालूक्यातील बाणगाव टाकळी येथील शेतकरी सागर पवार हे पहाटेच्या सु

अजित पवार भाजपमध्ये जाणार ः अंजली दमानिया
ड्रोनद्वारे औषधे घरपोच होणार
केज-बीड रोडवर मस्साजोग येथे जीप दुचाकीचा भीषण अपघात अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी

नाशिक प्रतिनिधी – ही घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यातून समोर आली आहे. नांदगाव तालूक्यातील बाणगाव टाकळी येथील शेतकरी सागर पवार हे पहाटेच्या सुमारास त्यांच्या शेतातील विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर त्यांना विहिरीत साप दिसला. त्यानंतर त्यांनी नांदगाव येथील सर्पमित्र विजय बडोदे यांना फोन केला. बडोदे यांनी प्रयत्न करत सापाला विहिरीतून बाहेर काढले असता तो कोब्रा जातीचा असल्याचं लक्षात आलं. त्यांनी कोब्राला पकडताच दुसऱ्या कोब्राला पोटातून बाहेर काढायला सुरुवात केली. त्यामुळे चक्क कोब्रा सापाने भक्ष्यासाठी आपल्याच जातीच्या सापाला भक्ष्य केल्याची घटना घडली. ही घटना दुर्मिळ असल्याचं सर्प मित्र विजय बदोडे यांनी सांगितलं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सर्प मित्राने कोब्राला उलटं पकडलं आहे. तो पाटातून दुसरा कोब्रा बाहरे काढतोय. हे दृश्य अंगावर काटा आणणारं आहे. हे दुर्मिळ दृश्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे

COMMENTS