Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यात पात्र पूरग्रस्तांची रक्कम अपात्र व्यक्तीच्या खात्यात

कोल्हापूर / प्रतिनिधी : दुकानाला महापालिकेचा परवाना नाही, पंचनामे नाहीत, ग्रामपंचायतींकडून दिलेल्या पूरग्रस्तांच्या यादीत तुमचे नाव नाही, अशी एक ना अ

कराड बाजार समितीत शिराळ्यातील गूळाला 3 हजार 801 रूपये दर
Nashik : गिरणा धरण ओव्हरफ्लो.. पाच हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू
22 महिन्यांच्या पगारासाठी 400 कामगारांचा ’किसन वीर’ समोर ठिय्या

कोल्हापूर / प्रतिनिधी : दुकानाला महापालिकेचा परवाना नाही, पंचनामे नाहीत, ग्रामपंचायतींकडून दिलेल्या पूरग्रस्तांच्या यादीत तुमचे नाव नाही, अशी एक ना अनेक कारणे सांगत पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान नाकारण्यात आले. दुसरीकडे पात्र पूरग्रस्तांची रक्कम अपात्र व्यक्तीच्या बँक खात्यात वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार करवीर तहसील कार्यालयाकडून झाल्याचे निदर्शनास आले आहे.
सातारा जिल्ह्यात महापुरामुळे अनेक कुटुंबे स्थलांतरित झाले. हजारो कुटुंबांच्या घरात पाणी शिरले. या पार्श्‍वभूमीवर त्या कुटुंबांना प्रत्येकी 10 हजार रुपयांप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली. त्याची अंमलबजावणी करताना नियम आणि अटींचे तंतोतंत पालन करत असल्याचे दाखविले जात होते. यात अनेक पात्र लाभार्थी यापासून आजही वंचित राहिले आहेत.
ते ज्या-त्या तहसील कार्यालयात खेटे घालत आहेत. दरम्यान, पात्र लाभार्थ्यांचे सानुग्रह अनुदान अपात्र व्यक्तींच्या नावावर पाठविण्याचा कारभार करवीर तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचार्‍याने केला आहे. याची माहिती घेण्यास गेलेल्या संबंधित लाभार्थ्याला महापालिकेत जाऊन चौकशी करा, अशी उत्तरे दिली जातात. संबंधित पात्र लाभार्थी हा करवीर तालुक्यातील एका गावातील आणि अपात्र लाभार्थीही खेडेगावातील आहे. यात महापालिकेचा काय संबंध काय, हाच प्रश्‍न आहे. दरम्यान, मूळ लाभार्थ्यानेच आपली रक्कम दुसर्‍याच्या खात्यावर वर्ग झाल्याचे लक्षात आणून दिल्यावर करवीर तहसील कार्यालयाकडून संबंधित बँकेला पत्र लिहून ती रक्कम परत मूळ लाभार्थ्याच्या नावावर वर्ग करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, ज्या अपात्र लाभार्थ्याच्या नावावर ही रक्कम आहे, तो ही रक्कम देण्यास नकार देत आहे. त्यामुळे मूळ लाभार्थ्याला त्याच्या हक्काची रक्कम परत मिळवून देणार कोण, हाच मोठा गोंधळाचा विषय झाला आहे. एकीकडे ज्यांच्या घरात पाणी शिरले, त्यांना अनुदान मिळाले नाही म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक गावातून तक्रार येत आहे. त्याची खातरजमा केली जात असेल. पण, जो पात्र पूरग्रस्त आहे, त्याची रक्कम दुसर्‍याच्या खात्यावर पाठविणार्‍या त्या कर्मचार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.
खर्‍या पूरग्रस्तांना प्रशासकिय यंत्रणेकडून बेदखल
करवीर तहसील कार्यालयात पूरग्रस्तांना ऑनलाईन निधी वाटप करणारे कर्मचारी पूरग्रस्तांबरोबर सौजन्याने वागत नाहीत. एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम करत असल्याने हे कर्मचारी मूळ लाभार्थ्याचे पैसे इतरांच्या खात्यावर गेल्याचे सांगूनही त्या कर्मचार्‍यांकडून पूरग्रस्तांची दखल घेतली जात नाही.
माझ्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे मला सानुग्रह अनुदान मंजूर झाले. पण, ते माझ्या खात्यावर न पाठविता इतरांच्या नावावर वर्ग केले आहे. करवीर तहसीलमध्ये हे मी स्वत: त्या कर्मचार्‍याला सांगितले. त्यानंतर त्यांनी पत्र दिले व ती रक्कम माझ्या खात्यावर वर्ग करण्याच्या सूचना दिल्या. पण, वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम माझ्या खात्यावर वर्ग झाली नसल्याचाही संबंधिताने आरोप केला आहे.

COMMENTS