Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खरात आडगावमध्ये डुकरांचा बंदोबस्त करण्यावरून बेदम मारहाण

माजलगांव प्रतिनिधी - तालुक्यातील खरात आडगाव येथील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा याबाबत ग्रामीण पोलिसांना निवेदन दिल्यावरून सकाळी लाठ्या का

राशीनमध्ये 710 किलो गोमांससह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक
तक्रार अर्जांची आता पोलिस घेणार वेळेत दखल

माजलगांव प्रतिनिधी – तालुक्यातील खरात आडगाव येथील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा याबाबत ग्रामीण पोलिसांना निवेदन दिल्यावरून सकाळी लाठ्या काठ्यांना एकमेकांना मारहाण झाली असून यामध्ये जवळपास दहा ते पंधराजण जखमी झाले आहेत.
गावातील काही लोक शेळ्या आणि डुकर पाळतात त्यांची डुक्करं गावातील नागरीकांच्या घरादारांपर्यंत नव्हे तर स्वयंपाकाच्या ठिकाणीही जाऊन घाण पसरवतात. त्यामुळे गावात अस्वच्छेतेचा आणि नागरीकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. इतकचं नव्हे तर ही मोकाट सोडलेली डुक्करं व शेळ्या गावाच्या परिसरातील ऊस, कापसु, भाजीपाला, बाजारी, गह इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असल्याने शेतकर्यांच्या जीव अगदी मेटाकुटीला येत आहे. तसेच शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसाना बरोबरच प्रचंड मनस्तापही सहन करावा लागत आहे.याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा सुचना देवून, विनंत्या करुन सुध्दा सदरील व्यक्तींनी मोकाट सोडलेल्या डुक्करं व शेळ्यांबाबत काहीही केले नाही. याऊलट त्याबद्दल बोलायला गेलेल्या शेतकर्यांना कोणाकडे तक्रार करायची तर करा आम्हाला काहीही फरक पडत नाही व जो कोणी तक्रार करील त्या व्यक्तीस आम्ही बघून घेवू अशी दांडकशाहीची भाषा वापरुन अरेरावी करतात. त्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून जिवीत व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर असे काही झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील. तरी सदर बाबीची दखल घेवून मोकाट सोडलेल्या डुक्करं व शेळ्यांचा बंदोबस्त करावा आणि संबंधीत व्यक्तींवर आठ दिवसाच्या आत आवश्यक ती कारवाई करावी अन्यथा आठ दिवसाच्या नंतर तहसील कार्यालय माजलगाव येथे समस्त गावकरी मंडळी अमरण उपोषणास बसणार आहेत याची कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती. ग्रामपंचायत कार्यालय खरात आडगाव तेथील ग्रामसभेत ठराव केला त्यानुसार आढाव दसरथ, मधुकर शेजुळ गोपाळ गणेशराव,शेजूळ आमोल सुभाषराव,शेजूळे कैलास प्रभाकर 5. रोजून भारत संजिवन, लखन विश्वनाथ शेजू, शेजुळ लहू बाबुराव आढाव ज्ञानेश्वर आशोकराव, रोजून दादाराव आदींनी निवेदन दिले होते. या दिलेल्या निवेदनावरून गावातील रोहिदास राजभाऊ जाधव,दिनेश राजभाऊ जाधव,कैलास राजभाऊ,जाधव विकास शिवाजी जाधव,अजय शिवाजी जाधव राम गायकवाड यांनी आमच्या विरोधात निवेदन का दिले म्हणून मंगळवारी सकाळी सहा लोकांना मारहाण करण्यात आली यामध्ये कृष्णा गणेश शेजुळ गोपाळ गणेश शेजुळ ज्ञानेश्वर अशोक आढाव आनंद अशोक आढाव सुखदेव सुभाष आढाव हरिभाऊ सोमेश्वर शेजुळ लखन विश्वनाथराव शेजुळ यांना बीड येथे रुग्णालय वार्ड क्रमांक पाच मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

COMMENTS