Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडगाव येथे चार लाखाची वीज चोरी पकडली, एकाविरुद्ध गुन्हा 

अहमदनगर : विजेचे विजेचे इलेक्ट्रिक मीटर नसताना थेट फोनवरील तारेमधून विज कनेक्शन घेऊन वर्षभरात व 29 हजार 553 युनिटची चोरी करून महावितरण कंपनीची चा

सहकारी पतसंस्थांची थकबाकी वसुलीसाठी पोलिस सरंक्षण द्या
कृषी उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज
ताहराबादमध्ये घराचे कुलूप तोडून दागिने चोरीला

अहमदनगर : विजेचे विजेचे इलेक्ट्रिक मीटर नसताना थेट फोनवरील तारेमधून विज कनेक्शन घेऊन वर्षभरात व 29 हजार 553 युनिटची चोरी करून महावितरण कंपनीची चार लाख 70 हजार 444 रुपयाची फसवणूक केल्याची घटना केडगाव येथे उघडकीस आली. या बाबतची माहिती अशी की महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या.चे भरारी पथक नं 1 चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता,अशोक भास्कर बुंधे, (वय 51 वर्ष, वेदात सोसायटी ए-504, वायलेनगर, खडकपाडा, कल्याण) वीज ग्राहकांच्या मीटर व वीजपुरवठ्याची तपासणी करून बीज चोरी शोधण्याचे व त्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे काम करतात. अशोक बुंधे भरारी पथकामधील सहाय्यक अभियंता हेमंत तिडके 

वरिष्ठ तंत्रज्ञ प्रकाश कोळी बशिर एहमद हमीद खान, खान मल्ला यांच्यासह लिंक रोड, मोरचूड नगर, केडगाव, अहमदनगर या ठिकाणी गेले.तेथील अब्दुल सलाम या ग्राहकाची तपासणी केली असता सदर ग्राहकाकडे मीटर नसुन विजेच्या पोलवरून आलेल्या केवलच्या सहाय्याने वीज पुरवठा गाळ्यामध्ये घेत असल्याचे आढळले. म्हणजेच डायरेक्ट वीजपुरवठा होत असल्याचे आढळले. हि बाब सदर ग्राहक प्रतिनिधीस कलम 135 नुसार वीजचोरी या प्रकारात येते ते दाखवून समजावून सांगण्यात आले. या गाळ्यामधील जोडलेला भार मोजला असता तो 13.7 कि.वॅट इतका आढळला. सर्व तांत्रिक नोंदी स्थळ तपासणी अहवाल क्र. 8715 मध्ये नोंद केली. बशिर एहमद हमीद खान, (वय 50 वर्षे) यांनी दि.18 एप्रिल.2022 ते दि.18 एप्रिल 2023 या 12 महिन्यात एकुण 29 हजार 553 युनीटची वीज चोरी करून रूपये 4 लाख 70 हजार 444 रुपये 66 पैसै एवढया रक्कमेचे मराविविकं.मर्या.ची विज चोरी केली आहे म्हणुन त्याचे विरूध्द विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 व कलम 151 अन्वये गुन्ह्याची नोंद केली .

COMMENTS