Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेडमध्ये चोरट्यांनी डोके काढले वर

पोलिसांची बीट मार्शलद्वारे अनोखी गस्त

जामखेड प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून जामखेड शहरासह जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या चोरीच्या घटना घडत आहेत. भुरट्या चोरांनी ही

भीमसैनिकाच्या वतीने परभणीच्या घटनेचा अहिल्यानगर शहरात केला निषेध
 वृद्धेश्वर कारखान्याने ऊस गाळपाचे सहा लाख मॅट्रिक उद्दिष्ट:- राहुल राजळे
अक्षय पवार ठरला मल्हार केसरीचा मानकरी

जामखेड प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून जामखेड शहरासह जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या चोरीच्या घटना घडत आहेत. भुरट्या चोरांनी ही डोके वर काढले आहे. काही घटना पोलिसांत दाखल होतात तर अनेक घटना पोलिसांसमोर जात नाहीत. दाखल प्रकरणी चोरांवर कारवाई होतांना दिसत नाही त्यामुळे दिवसेंदिवस भुरट्या चोरांचे मनोबल वाढत आहे. तसेच नागरिकांचा रोषही वाढत आहे. शहरासह तालुक्यात चोर्‍या, वाहन चोर्‍यांचे प्रमाण काही दिवसांमध्ये वाढलेले होते. बाजारातून मोबाईल चोरणे, घरासमोरून दुचाकी चोरणे, पाळत ठेऊन लोकांची बंद घरे फोडणे,  ऐवज लंपास करणे, धूमस्टाईलने दागिने ओरबडणे, मोबाईल हिसकावणे अशा घटना वारंवार घडत आहेत. या चोर्या करणारे काही ठराविक चोरटे आहेत. त्यांचा बंदोबस्त केला तर अशा घटनांना आळा बसण्यात मदत होईल. मात्र, अपुरे पोलिस बळ व वाढत्या कामाच्या व्यापामुळे पोलिसांना गुन्हेगारांचे मुळे शोधण्यास पूरेसा वेळ मिळत नसल्याचे दिसत आहे.

पोलिस सतत लोकांमध्येच ः पोलिस निरीक्षक महेश पाटील – चोर्‍या, घरफोड्या, वाहनचोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या संकल्पनेतून बीट मार्शल म्हणून पोलिस पथकांची स्थापना करण्यात आली आहे. सदर बीट मार्शलबाबत सांगताना पोलिस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, बीट मार्शलद्वारे चौवीस तास गस्त घालण्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे. या बीट मार्शलमुळे गुन्हेगारीवर पोलिसांना नियंत्रण मिळवता येणार आहे. बीट मार्शलद्वारे नियुक्त करण्यात आलेले पोलिस कर्मचारी शहरातील प्रत्येक भागात फिरून दिवसा व रात्री दोन्ही वेळेत गस्त घालणार आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी खर्डा चौक व बीड रोड कॉर्नर या अति महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले. सदर बीट मार्शलच्या सतत गस्तीने शालेय परिसर, बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणांवर होणारया गुन्हेगारी घटनांना आळा बसेल.बीट मार्शलचे पोलिस सतत लोकांमध्ये दिसतील त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसेल. नागरिकांनीही अशा घटनांची माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे असेही आवाहन पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.

COMMENTS