ठाणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्रात कोणत्याही निवडणुका नसल्या तरी, राजकीय वातावरण तापले असून, आगामी मोर्चेबांधणी जोरात सुरू असतांनाच, गोंदियामध्ये राष्

ठाणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्रात कोणत्याही निवडणुका नसल्या तरी, राजकीय वातावरण तापले असून, आगामी मोर्चेबांधणी जोरात सुरू असतांनाच, गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसला मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांनी शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. ठाण्यामध्ये झालेल्या या प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांच्या अंगावर भगवा रंगाची शाल टाकत त्यांना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची गोंदियातील ताकद वाढली आहे. तर राष्ट्रवादीला गोंदियात मोठा फटका बसला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे गोंदियातील दोन नगराध्यक्ष, 15 नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महिला कार्यकर्त्याही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दीघे यांच्या नावाने जयघोष केला. या पक्षप्रवेशामुळे गोंदियात राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडली आहे. नगराध्यक्ष डॉ. चंद्रिकापुरे हे सडक अर्जुनी तालुक्यात राहतात. माझ्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. सडक अर्जुनी नगर पंचायत आणि अर्जुनी नगरपंचायतमधील 15 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे. दोन बांधकाम सभापती आणि बाकी वॉर्ड सदस्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी आम्ही शिंदे गटात प्रवेश केला आहे. विदर्भ हे मागास क्षेत्र आहे. आम्हाच्या भागात निधी डावलला जातो. त्यामुळे या भागाचा विकास व्हावा म्हणून आम्ही शिंदे गटात आलोय, असे या चंद्रिकापुरे यांनी सांगितले. दरम्यान, आमच्या संपर्कात अनेक नेते आणि कार्यकर्ते असल्याचा दावा यापूर्वीच शिंदे गटाने केला आहे. यात ठाकरे गटाचे नेते, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारीही असल्याचे सांगितले जात आहे. तसेच जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे हे पक्षप्रवेश वाढतील असेही सांगितले जात आहे.
COMMENTS