बीडमध्ये पुन्हा पत्नीने पतीचा गळा आवळून केला खून

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये पुन्हा पत्नीने पतीचा गळा आवळून केला खून

बीड प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये काल पत्नीने पती आवडत नसल्याने त्याचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर स

प्रसिद्ध रॅपरची गोळ्या घालून हत्या
35 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण.
अनैतिक संबंधातून मुलांनीच जन्मदात्यांची केली हत्या

बीड प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये काल पत्नीने पती आवडत नसल्याने त्याचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर सोमवारी पुन्हा परळी तालुक्यात अशीच घटना घडली आहे. दोरीने पतीचा गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. दुसरी घटना बीडच्या परळी तालुक्यातील हिवरा येथे घडली आहे. हनुमान ऊर्फ राजाभाऊ अशोक काकडे (वय 30) याचे त्याची पत्नी वैष्णवी हिच्यासोबत जोरदार भांडण झाले. 11 नोव्हेंबर रोजी त्यांच्या भांडण झाले. रात्री केव्हातरी वैष्णवीने खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला आणि पती हनुमानचा गळा दोरीने आवळला. या घटनेचा आळ आपल्यावर येऊ नये यासाठी वैष्णवीने पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. छताला दोरी अडकवून दरवाजा उघडला आणि बाहेर येत पतीने जीव दिल्याचे सांगितले. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये हनुमानचा गळा दाबल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS