Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खुनातील संशयित आरोपीला 24 तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

   धुळे प्रतिनिधी - धुळे शहरातील साक्री रोडवरील जमनागिरी भिलाटीतील राहत्या घरात महिलेचा खून करणार्‍या संशयीत आरोपीला धुळे शहर पोलिसांनी 24 तासां

सलमान खानने शिकार केलेल्या काळवीटाचे स्मारक उभारले जाणार.
मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेचा ‘मेगा प्लॅन’… १७७५ कोटी करणार खर्च…
भावकीत तलवारीचा घाव ! चुलत भावाचा तलवारीने भावावरच जीवघेणा हल्ला

   धुळे प्रतिनिधी – धुळे शहरातील साक्री रोडवरील जमनागिरी भिलाटीतील राहत्या घरात महिलेचा खून करणार्‍या संशयीत आरोपीला धुळे शहर पोलिसांनी 24 तासांच्या आतच बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेतील संशयित आरोपीला शिर्डीतून ताब्यात घेण्यात आले. शहर पोलिसांच्या वेगवान कामगिरीचे पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पथकाला 5 हजारांचे बक्षीस जाहीर केले.

निता वसंत  गांगुर्डे (सोहीके) असे मयत महिलेचे नाव आहे. ती बादल रामप्रसाद सोहिते याच्या सोबत लग्न करावयाचे म्हणुन मार्च 2020 पासुन घरातुन निघुन गेली होती. बादल सोहिके व निता गांगुर्डे हे दोघे गोपाळनगर मागील जमनागिरी भिलाटीत 4 ते 5 महिन्यापासुन एकत्र राहत होते. बादल सोहिते हा निता हिच्या चारीत्र्यावर संशय घेवुन तिला मारहाण करीत असे. दि.14 जानेवारी रोजी रात्री साडेदहा ते दि.15 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेदरम्यान बादल सोहिते याने निताच्या चारीत्र्याचे संशयावरुन चेहर्‍यास मारहाण करुन तिचा खुन करुन फरार झाला होता.

याबाबत मयत निताचा भाऊ सचिन वसंत गांगुर्डे (वय 28 रा.रमाबाई आंबेडकर नगर, गल्ली नं.9 देवपुर धुळे) याने दिलेल्या फिर्यादीवरुन बादल सोहिते याच्याविरोधात काल सायंकाळी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेत धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, पोना कुंदन पटाईत, पोकॉ निलेश पोतदार, पोकॉ मनिष सोनगीरे यांनी गुन्हयातील फरार आरोपीताला शिर्डी येथुन ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, सहा.पोलीस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

COMMENTS