लाहोर/वृत्तसंस्था : पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्यावर आलेले बालंट त्यांनी शिताफीने परतून लावत विरोधकांना चीतपट केले आहे. पाकिस्तानच्या संसदेमध्ये इ
लाहोर/वृत्तसंस्था : पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्यावर आलेले बालंट त्यांनी शिताफीने परतून लावत विरोधकांना चीतपट केले आहे. पाकिस्तानच्या संसदेमध्ये इम्रान खान सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव मतदानासाठी घेण्याआधी तो फेटाळून लावत इम्रान खान यांच्या शिफारशीनंतर अखेर पाकिस्तानची नॅशनल असेंबली (संसद) बरखास्त करण्यात आली आहे. इम्रान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याकडे संसद बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानची संसद बरखास्त केल्यानंतर इम्रान खान हे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहणार आहे.त्यामुळे आता पाकिस्तानात 90 दिवसात म्हणजे तीन महिन्यात निवडणुका घेणं बंधनकारक आहे. तोपर्यंत मात्र, अविश्वास प्रस्ताव फेटाळल्या गेल्यानंतर इम्रान खान यांनी संसदभंग करण्याची शिफारस करून विरोधकांना चीतपट केलं आहे. इम्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी करण्याची आणि त्यांना अटक करण्याची विरोधकांची खेळी इम्रान खान यांनी मोठ्या चतुराईने उधळून लावली आहे. तर, नव्याने निवडणुका होणार असल्याने इम्रान खान यांची पुन्हा सत्तेत वापसी होणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री फारूख हबीब यांनी याबाबतची माहिती दिली. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधानांच्या शिफारशीची दखल घेऊन नॅशनल असेंबली बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतींनी 90 दिवसात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत, असं हबीब यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आले आहे, अशी माहिती माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी दिली. विशेष म्हणजे अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले असते तर इम्रान खान यांची सत्ता गेली असती. 342 सदस्य संख्या असलेल्या नॅशनल असेंबलीत बहुमतासाठी 172 सदस्यांचा आकडा आवश्यक आहे. मात्र, इम्रान खान यांच्या विरोधात त्यांच्या सहकार्यांनी बंड पुकारले होते. त्यामुळे इम्रान खान यांची सत्ता जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, इम्रान खान यांच्या खेळीमुळे संसद भंग कररण्यात ते यशस्वी ठरले आहेत. दरम्यान, इम्रान खान यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अविश्वास प्रस्ताव हा परदेशी षडयंत्र होते, असा आरोप केला आहे. राष्ट्रपतींना संसद बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. निवडणुकीनंतरच कोण पाकिस्तानवर राज्य करेल हे दिसून येईल, असे खान यांनी म्हटले आहे.
विरोधकांचे षडयंत्र उधळून लावले : इम्रान खान
अविश्वास प्रस्ताव फेटाळल्या गेल्यानंतर देशाला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की सगळ्या जनतेसमोर एक देशद्रोह होत होता, देशद्रोही बसलेले होते आणि षडयंत्र रचलं जात होतं. मी त्यांना संदेश देऊ इच्छितो, अल्लाहचे जनतेकडे लक्ष आहे. अशाप्रकारचे षडयंत्र जनता यशस्वी होऊ देणार नाही. सभापतींनी आज आपल्या अधिकारांचा वापर करून जो निर्णय दिला आहे. त्यानंतर मी आताच राष्ट्रपतींना सूचना पाठवली आहे. की सभागृह विसर्जित करा. एका लोकशाही समाजात आपण लोकशाही जनतेकडे जावे, निवडणुका व्हाव्यात जनता निर्णय घेईल.
COMMENTS