Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेकिंग व्यवसायाच्या आणि उद्योगाच्या वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल

नाशिक -  जनरल मिल्स इंडिया, अमेरिका स्थित फॉर्च्युन 500 पॅकेज्ड फूड कंपनी, जनरल मिल्स इनकॉर्पोरेशनचा भाग आहे. नुकतेच कंपनीच्या नाशिक, महाराष्ट्रा

Beed : बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी (Video)
ग्रामरणरागिनी पुरस्काराने वर्षाताई जवळ सन्मानित
केतुरा येथे 50 लक्ष रु.च्या विविध विकास कामांचा शुभारंभ

नाशिक –  जनरल मिल्स इंडिया, अमेरिका स्थित फॉर्च्युन 500 पॅकेज्ड फूड कंपनी, जनरल मिल्स इनकॉर्पोरेशनचा भाग आहे. नुकतेच कंपनीच्या नाशिक, महाराष्ट्रातील नवीन प्लांटचे भूमिपूजन करण्यात आले होते. नवीन प्लांट भारतीय बाजारपेठेसाठी पिल्सबरी बेकिंग मिक्स तयार करण्यासाठी मुख्य उत्पादन केंद्र म्हणून काम करेल आणि ऑगस्ट 2024 पर्यंत कार्यान्वित होणार आहे.नवीन प्लांट पिल्सबरी बेकिंग मिक्ससाठी जनरल मिल्सची भारतातील दुसरी उत्पादन सुविधा असेल.  अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज बनवण्यासाठी कंपनी अंदाजे 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. या नवीन सुविधेची भर पडल्याने जनरल मिल्स इंडियाच्या उत्पादना मध्ये दुप्पट वाढ होईल. ज्यामुळे कंपनीला भारतातील पिल्सबरी बेकरी सोल्यूशन्सची वाढती मागणी पूर्ण करता येईल. पिल्सबरी ब्रँडच्या बेकिंग मिक्सची बेकरी उद्योगात मोठ्या प्रमाणात मागणी आहे आहे आणि भारतातील वाढत्या बेकरी आणि फूड सर्व्हिस इंडस्ट्रीला बेकिंग उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी नवीन प्लांट महत्वाचा आहे.जनरल मिल्स इंडियाचे कंट्री डायरेक्टर श्री. आनंद खुराना म्हणाले कि, “भारतातील बेकरी उद्योगात उल्लेखनीय वाढ होत आहे. “वाढदिवसांव्यतिरिक्त, केक कापणे, वर्धापन दिन तसेच इतर मेजवानी आणि उत्सव प्रसंगांचा अविभाज्य भाग आहे. पिल्सबरीचे बेकरी सोल्यूशन्स बेकर्सना प्रत्येक केक बॅचमध्ये सातत्यपूर्ण गुणवत्ता देतात आणि बेकरी व्यवसायांच्या कामकाजात कार्यक्षमता वाढवतात. नवीन सुविधा भारतातील अधिक बेकर्सना सेवा देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसाय वृद्धिसाठी पिल्सबरीची वचनबद्धता दाखवत आहे.”जनरल मिल्सच्या जागतिक वाढीच्या धोरणात, भारत देश महत्त्वाचा घटक आहे. नवीन प्लांटसह उत्पादन क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय हा बेकिंग व्यवसायाच्या आणि उद्योगाच्या वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

COMMENTS