Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिस्तीसह हवे वेळेचेही व्यवस्थापन : शेलार

 अकोले : दैनंदिन जीवनातील विविध अनुभव हेच आपले खरेखुरे मार्गदर्शक असतात. अशावेळी नेमके नियोजन आवश्यक ठरते. व्यक्तिपरत्वे मनोभूमिका हीच दिशादायी बळ

अगस्ती विद्यालयाचा पारितोषिक समारंभ उत्साहात
शेरणखेल येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर
शेतकऱ्यांनी केली होती गांज्याची शेती… पोलिसांनी टाकली धाड…

 अकोले : दैनंदिन जीवनातील विविध अनुभव हेच आपले खरेखुरे मार्गदर्शक असतात. अशावेळी नेमके नियोजन आवश्यक ठरते. व्यक्तिपरत्वे मनोभूमिका हीच दिशादायी बळ प्राप्त करुन देण्याकरिता उपयुक्त असते असे प्रतिपादन बेलवंडी येथील व्यवस्थापन क्षेत्राचे अभ्यासक वैभव शेलार यांनी केले. अगस्ती महाविद्यालयातील ग्लोबल नगरी उपक्रमांतर्गत ऑनलाइन व्याख्यानमालेत ते प्रमुख वक्ते म्हणून  वेळेचे व्यवस्थापन या विषयावर बोलत होते.

 व्यक्तिमत्व विकासाच्या संधी समजावून सांगताना वैभव शेलार पुढे म्हणाले, ‘राखीव वेळेचे व्यवस्थापन ही देखील लक्षणीय कला असून वेळेचा चांगल्या प्रकारे वापर व्हायला हवा याबाबतीतची दक्षता यशाकडे घेऊन जाते. स्वयं नियंत्रणाबरोबरच आपल्यातील सवयींचेही व्यवस्थापन असावे लागते. शिस्तीसह नियोजनातील प्राधान्यक्रम गती प्राप्त करुन देतो. रोजच्या दिनक्रमातील वेळ वाया जाता कामा नये यावर कटाक्ष असायला हवा. चालढकल करण्याची वृत्ती ही नियोजनास आणि सफल जीवनात बाधा आणते. प्रत्येक दिवसासाठीचा संपूर्ण आराखडा हा आवश्यकच आहे हे कधीही विसरू नका. मेंदूचा कल सारे काही घडवितो.

 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी वेळेच्या व्यवस्थापनातील विद्यार्थ्यांची भूमिका ही अनमोल असल्याचे सांगून प्रगतीचा हे सद्गुण आधार असल्याचे स्पष्ट केले.  ग्लोबल नगरी उपक्रमाच्या समन्वयक प्रा. कोमल राठी यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.

 डॉ. शिवाजी खेमनर, डॉ. विजय भगत, प्रा. संदेश कासार, उपप्राचार्य डॉ. साहेबराव गायकवाड, डॉ. सचिन पलांडे, डॉ. महेजबीन सय्यद, डॉ. संपत सोनवणे, डॉ. किरण जाधव, प्रा.अश्पाक पठाण यांच्यासह अन्य प्राध्यापक आणि मान्यवर तसेच बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

COMMENTS