Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला सन्मान योजनेची अंमलबजावणी सुरू

50 टक्के सवलतीत महिलांचा एसटी प्रवास सुरु

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्याच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्

वाळू तस्करांच्या ट्रॅक्टरने महिलेला चिरडले!
शिक्रापूरजवळील अपघातात पाच जणांचा मृत्यू | DAINIK LOKMNTHAN
बेजबाबदारपणाचे 11 बळी

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्याच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शुक्रवारी 17 मार्चपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे.
राज्य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पांत महिला सन्मान योजना जाहीर केली. या योजनेत महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. ही योजना लवकर लागू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार शुक्रवारपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याच्या या योजनेच्या अंमलबजवणीला सुरुवात होणार आहे. ही रक्कम दरवर्षी राज्य शासन महामंडळाला देणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.

COMMENTS