Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फी भरण्याच्या निर्णयाची 2017 पासून अंमलबजावणी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई : बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या केवळ मुलींचीच नाही तर मुलांचीही 100 टक्के फी भरण्याबाबत शासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आह

महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगाव बंदी
चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाईफेक
शासकीय वसतिगृहांतील महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य

मुंबई : बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या केवळ मुलींचीच नाही तर मुलांचीही 100 टक्के फी भरण्याबाबत शासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. 7 ऑक्टोबर, 2017 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली. महाराष्ट्र शासनाने राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, अशा सर्व मुलींची 100 टक्के फी शासन भरेल, अशी घोषणा करुन त्याची अंमलबजावणी होण्याबाबत अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत रितसर मान्यता घेऊन शासन निर्णय निर्गमित केला. व्यावसायिक अभ्यासक्रमांची मुलींची 100 टक्के फी सरकार भरेल, यावर अनेकांनी आनंद व्यक्त करताना बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांचीही (कला, वाणिज्य, विज्ञान इ.) 100 टक्के फी शासनाने भरावी, असा मुद्दा उपस्थित केला. त्या अनुषंगाने मंत्री पाटील यांनी स्पष्टीकरण केले. राज्यात मुलींचे व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाचे प्रमाण एकूण विद्यार्थी लोकसंख्येमध्ये 36 टक्के असून प्रगतीशील राज्यामध्ये हे प्रमाण वाढण्याची आवश्यकता विचारात घेऊन मुलींची शिक्षण फी 100 टक्के माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS