जालना प्रतिनिधी - आम्हाला नको असलेलं आऱक्षण सरकार देत आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात नेमकी अडचण काय आहे? अशी विचारणा मनोज जरांगे यांनी
जालना प्रतिनिधी – आम्हाला नको असलेलं आऱक्षण सरकार देत आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात नेमकी अडचण काय आहे? अशी विचारणा मनोज जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे लोकांशी संवाद साधाताना कुणबी प्रमाणपत्र ने घेणाऱ्यांना पश्चाताप होईल असंही सांगितलं. आता ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांचा उल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच 24 फेब्रुवारीला सकाळी 10.30 वाजता राज्यभरात रास्ता रोको करण्याचं आवाहन केलं आहे.
“आम्हाला नको असलेलं आऱक्षण सरकार देत आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली तरच आम्ही माघार घेऊ. दोन दिवसांत अंमलबजावणी करा. मराठा आणि कुणबी सरसकट करायला काय अडचण आहे? कुणबी प्रमाणपत्र ने घेणाऱ्यांना पश्चाताप होईल. 5-6 जण वगळता सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे. आता आपले कुणबी असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे कुणबी मराठे एकच आहेत. ज्यांना कुणबी नको ते आपल्यावर रुसले आहेत त्यामुळे ज्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळालंय त्यांनी ते घ्यावं,” असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. ज्याची कुणबी नोंद सापडली त्या कुणबी नोंदीचा आधार घेऊन त्याच्या सग्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. आता ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही,” असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. तसंच यावेळी त्यांनी छगन भुजबळांचा उल्लेख न करता त्यांच्यावर जोरदार टीका केली
COMMENTS