Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लसीकरण विशेष मिशन ईंद्रधनुष 5.0″ लसीकरण मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन

नाशिक प्रतिनिधी - बालकांमधील मृत्यु व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. तथापी, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे

लाठीहल्ल्याचे पडसाद दुसर्‍या दिवशीही तीव्र
नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल
कानपुरमध्ये पिटबुलचा गायीवर हल्ला

नाशिक प्रतिनिधी – बालकांमधील मृत्यु व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. तथापी, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात . तसेच केंद्रशासनाने डिसेंबर 2023 पर्यंत गोवर रुबेला आजाराचे दूरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.

यासाठी केंद्र शासनाने माहे ऑगस्ट 2023 पासून 3 फे-यांमध्ये सर्व जिल्ह्यात ” विशेष मिशन ईंद्रधनुष 5.0″ कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने नाशिक जिल्हयामध्ये देखील ऑगस्ट 2023 पासून ” विशेष मिशन ईंद्रधनुष 5.0″ मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत लसीकरणपासून पुर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचे व गरोदर माता यांचे आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, नर्सिंग स्टाफ मार्फत घरोघरी जाऊन  सर्व्हे करण्यात आला आहे. शिल्लक राहिलेले बालके आणि गरोदर माता यांचे लसीकरण या मोहिमे अंतर्गत करण्यात येणार आहे. 

सदर मोहिम 100 टक्के यशस्वी होणेसाठी तसेच प्रभावीपणे अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती सभा (DTF) बैठक  मा.जिल्हाधिकारी, नाशिक तथा अध्यक्ष “विशेष मिशन ईंद्रधनुष 5.0” व नियमित लसीकरण यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता मा.जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी जिल्हास्तरीय विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर वामन मोरे यांनी मोहिमेबाबत माहिती दिली. डॉ.हर्षल नेहेते जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी यांनी या मोहिमेमध्ये लसीकरण सत्राचे नियोजन शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात केले जाईल याबाबत अवगत केले. सर्व सत्रे ही यु-विन ॲपवर करण्यात येणार आहेत. ही मोहिम तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. पहिला टप्पा  7 ते 12 ऑगस्ट 2023, दुसरा टप्पा 11 ते 16 सप्टेंबर 2023 आणि तिसरा टप्पा 9 ते 14 ऑक्टोबर 2023 या तीन टप्प्यात मोहिम राबविण्यात येईल. डॉ.प्रकाश नांदापूरकर, एस.एम.ओ, जागतिक आरोग्य संघटना, नाशिक मंडळ यांनी “विशेष मिशन ईंद्रधनुष 5.0” व नियमित लसीकरण बाबत प्रस्तावित केले व मोहिमेची माहिती  सादर केली. यामध्ये वंचित राहिलेले व अर्धवट लसीकरण झालेले गरोदर माता व 0 ते 5 वर्षे वयापर्यंतच्या सर्व बालकांचा शोध घेवून त्यांना लसीकरण करण्याबाबत मार्गदर्शन केले. शेवटी  मा.जिल्हाधिकारी श्री.जलज शर्मा  यांनी “विशेष मिशन ईंद्रधनुष 5.0” यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ते सहकार्य करावे, तसेच जनजागृती करण्यात येवून मोहिम शंभर टक्के यशस्वी  करावी असे आवाहन केले.

COMMENTS