Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ससेवाडी येथे पर्यावरण दिनानिमित्त जलपूजन, वृक्ष लागवड

अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- नवजीवन प्रतिष्ठान समन्वयीत, कमिन्स इंडिया फाउंडेशन अर्थसहाय्यीत मॉडेल व्हिलेज प्रकल्प ससेवाडी येथे जागतिक पर्यावरण दिना

लोहा तालुक्यातील वादळी वार्‍यासह गारपीट
मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात
लातुरात 78 बँक कर्मचार्‍यांनी केले रक्तदान
Displaying 1002420401.jpg

अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- नवजीवन प्रतिष्ठान समन्वयीत, कमिन्स इंडिया फाउंडेशन अर्थसहाय्यीत मॉडेल व्हिलेज प्रकल्प ससेवाडी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जलपूजन, वृक्ष लागवड व विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी कमिन्स कंपनीचे गुणवत्ता विभाग व्यवस्थापक सुनील भटखंडे, सुविधा विभाग व्यवस्थापक अनुसया प्रसाद, सुरक्षा विभागाचे सूरज मंधारे, प्रकल्प प्रमुख किरण क्षीरसागर (कमिन्स जनरेटर टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि.), तसेच नवजीवनचे राजेंद्र, पवार, उदय पवार, सुदीप पडवळ, धोंडिभाऊ जरे, ससेवाडीचे सरपंच , उपसरपंच, चेअरमन, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हवामान बदलामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असून सध्या काही भागात भरपूर पाऊस तर काही भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पर्यावरणाच्या ह्रासामुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे या विचाराने कमिन्स इंडिया कंपनीच्या २५ अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन ससेवाडी येथे वृक्षलागवड केली.

नवजीवन प्रतिष्ठान समन्वयीत व कमिन्स इंडिया फौंडेशनच्या आर्थिक सहकार्याने ससेवाडी ता.जि. अहिल्यानगर येथे राबविण्यात येणाऱ्या मॉडेल व्हिलेज प्रकल्पांतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत कमिन्स इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सीनाशंकर मंदिर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड केली. सीना नदीच्या उगमस्थानी वृक्ष लागवड करण्यात आली, तसेच कमिन्स इंडिया च्या सहकार्याने खोलीकरण केलेल्या नागझरी तलाव येथे सर्व मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करून विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात नवजीवन संस्थेच्या माध्यमातून कमिन्स कंपनीच्या सहकार्याने गावात आजपर्यंत झालेल्या खंडोबादरा तलाव आणि सीनाशंकर तलाव लिकेज दुरुस्ती आणि खोलीकरण, WAT, केशर आंबा व संत्रा फळबाग, सेंद्रिय शेती, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डायनिंग कम मल्टीपर्पज हॉल तसेच टॉयलेट आणि बाथरूम आदी विकासकामांबद्दल ससेवाडीचे सरपंच व ग्रामस्थांनी नवजीवन संस्था व कमिन्स कंपनी यांचे आभार मानले.

COMMENTS