माहूर प्रतिनिधी - वडसा पाडस व सायफल येथील पैनगंगा नदीपात्रात अवैध वाळू उपसा वाळू माफिया कडून केला जात आहे. वाळू उपसावर बंदी असतानाही पडसा परिसरात

माहूर प्रतिनिधी – वडसा पाडस व सायफल येथील पैनगंगा नदीपात्रात अवैध वाळू उपसा वाळू माफिया कडून केला जात आहे. वाळू उपसावर बंदी असतानाही पडसा परिसरात मात्र रात्रभर अवैध वाहतुकीने थैमन घातले आहे. परंतु याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष नाही महसूल विभागाचे लक्ष नाही का? यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पैनगंगा नदी पात्रात रात्रभर शासनाचा महसूल बुडवून वाळूच्या टिपर्याच्या साह्याने वाहतूक केली जात आहे त्यामुळे ओहर वाहतुकीमुळे रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे परिणामी यामुळे . भरधाव येणार्या वाळूच्या गाड्या यामुळे सध्या सुरू. चोरट्यांनी बेदम वाळू उपसा चोरी करत आहे त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना रात्रीचा प्रवास जीव धरून करावा लागत आहे. किनवट,माहूर वाई बाजार, सारखणी, व पुसद या ठिकाणी वाळूची वाहतूक केली जात आहे सायफल,पडसा पैनगंगा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असून वाळू माफिया वाळू दिवस रात्रभर या वाळूची वाहतूक करीत आहे. वाळू माफीयांनी स्थानिक पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनातील अधिकार्यांना हाताशी धरून आपला धंदा सुरू ठेवला आहे. माहूर व सिंदखेड पोलीस स्टेशनच्या सहा ते सात किलोमीटर अंतरावरून होत असलेली अवैध वाळू वाहतुकीकडे मात्र पोलीस प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे त्यांच्या अर्थपूर्ण संबंधातून ही अवैध वाळू वाहतूक सुरू असते असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामध्ये आता नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. महसूल मधील वरिष्ठ अधिकारी यांनी अवैध वाळू वाहतूक बंद करण्यासाठी स्थानिक अधिकार्यासह धडक कारवाई करण्याची गरज आहे.
COMMENTS