नगर शहरात आशा टॉकीज चौकात खुलेआम अवैधरित्या शस्त्रांची विक्री

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर शहरात आशा टॉकीज चौकात खुलेआम अवैधरित्या शस्त्रांची विक्री

कोतवाली पोलिस ठाण्यालगत तलवारी व प्राणघातक शस्त्राची विक्री करणा-यास अटक

     अहमदनगर प्रतिनिधी / अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्या(Kotwali Police Station) लगत असलेल्या आशा टॉकीज चौक(Asha Talkies Chowk) येथील दुकानात

रक्तदान करुन छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
मंदा आरोटे यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी ः विजयराव चौधरी
पश्‍चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्यासाठी सकारात्मक

     अहमदनगर प्रतिनिधी / अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्या(Kotwali Police Station) लगत असलेल्या आशा टॉकीज चौक(Asha Talkies Chowk) येथील दुकानात तलवारी गुप्त्या व चाकूची सर्रास विक्री करणाऱ्या दुकान चालकावर कोतवाली पोलिसांनी कारवाई करून त्यास ताब्यात घेतले आहे . त्याच्याकडील 28 हजार पाचशे रुपये किमतीचे तलवारी व प्राण घातक शस्त्र जप्त केले. ही कारवाई आशा टाकी शेजारील अरीशा कलेक्शन या दुकानात केली. हुमायुन उर्फ मयुर उमर शेख(Humayun alias Mayur Umar Shaikh)  हा  व्यक्ती दुकानात मिळून आला. व त्याचे दुकानात काउंटर खालील भागात प्राणघातक हत्यारे मिळून आले . या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलिस नाईक योगेश भिंगारदिवे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे हे करीत आहेत.

COMMENTS