Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मयताच्या वारसाला न विचारता जमिनीची बेकायदा विक्री

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी: दुय्यम निबंधक कार्यालय श्रीगोदा या ठिकाणी दिनांक 03 जानेवारी 2024 रोजी मयताच्या वारसाला विचारात न घेता जमिनीची बेकायदशी

दहा द्राक्ष बागायतदारांना जयपूरच्या व्यापाऱ्याकडून गंडा 
राहुरीतील व्यापार्‍याला 23 लाख रूपयांना घातला गंडा
‘मी अध्यक्ष’ असल्याची थाप मारत भामट्याने चक्क विकली शाळा.

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी: दुय्यम निबंधक कार्यालय श्रीगोदा या ठिकाणी दिनांक 03 जानेवारी 2024 रोजी मयताच्या वारसाला विचारात न घेता जमिनीची बेकायदशीरपणे विक्री केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने तब्बल 9 जनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी यांनी आपसात बेकायदेशीरपणे संगनमत करुन मौजे उक्कडगांव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथील गट नं.200/01 मधील नील 80.00.00 आर चौ.मी. (0 हे. 80 आर) बिनशेती मिळकत कंपनीचे नावे असताना व कंपनीमध्ये पाच संचालक असताना व पाचपैकी एक संचालक बाळु संपत कातोरे उर्फ सुभाष संपत कातोरे हे मयत झाल्यानंतर त्यांना फिर्यादी व इतर वारस असल्याचे माहित असताना त्यांचे वारसांचे संमतीविना आरोपी दत्तात्रय कुंडलिक कातोरे वय 70 वर्षे धंदा शेती, बापुराव किसन कातोरे वय 65 वर्षे धंदाशेती, भगवान सोनबा शिर्के वय 60 वर्षे धंदा शेती, शरद गंगाराम महाडीक वय 55 वर्षे धंदा शेती यांनी दिनांक 3 जानेवारी 24 रोजी प्रसाद तुकाराम महाडीक वय 39 वर्षे धंदा शेती, प्रशांत तुकाराम महाडीक वय 35 वर्षे धंदा शेती, प्रकाश ज्ञानदेव महाडीक वय 35 वर्षे धंदा शेती, संतोष तुकाराम महाडीक वय 33 वर्षे, धंदा शेती, तेजस जनार्धन महाडिक वय 19 वर्षे, धंदा शेती, यांना खरेदीखत दस्त नं. 131/2024 अन्वये विक्री केली. सदर मिळकतबाबत आरोपी यांनी सुभाष संपत कातोरे यांचे कायदेशीर वारसांची संमती न घेता, बेकायदेशीरपणे फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने विक्री केलेली आहे. अशा आशयाचा दावा यातील फिर्यादी यांनी क्री.एम.ए. 56/2024 अन्वये श्रीगोंदा गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने दिनांक 18 एप्रिल 24 रोजी जावक क्रमांक गुन्हा दाखल 1180/2024 अन्वये सी आर पी सी क 156/3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेशानुसार आशा सुभाष कातोरे वय 61 वर्ष धंदा- शेती रा. उक्कडगाव यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रेय कुंडलिक कातोरे वय 70 वर्षे धंदा शेती, बापुराव किसन कातोरे वय 65 वर्षे धंदा शेती, भगवान सोनबा शिर्के रा. बाबुर्डी ता. श्रीगोंदा वय 60 वर्षे धंदा शेती, शरद गंगाराम महाडीक वय 55 वर्षे धंदा शेती, प्रसाद तुकाराम महाडीक वय 39 वर्षे धंदा शेती, प्रशांत तुकाराम महाडीक वय 35 वर्षे धंदा शेती, प्रकाश ज्ञानदेव महाडीक वय 35 वर्षे धंदा शेती, संतोष तुकाराम महाडीक वय 33 वर्षे, धंदा शेंती, तेजस जनार्धन महाडिक वय 19 ु व9 धंदा शेती, रा. उक्कडगाव ता. श्रीगोंदा यांचेवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भा.द.वी. कलम 418,420,465,467,471,511,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पो.हे. काँ संतोष फलके हे ने तपास करत आहेत.

COMMENTS