Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेकायदा बार आणि पबवर बुलडोझर फिरवला

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीरा भाईंदरमधील अमली पदार्थांचा व्यवसाय होत असलेली अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. य

नाशिकमध्ये ओबीसी आक्रोश मोर्चा l पहा LokNews24
Nashik : मित्राला मिठी मारली म्हणून नाशिकमध्ये जीवघेणा हल्ला | LOKNews24
अहमदनगर शहरात राष्ट्रवादीला जबर झटका… माजी विरोधीपक्षनेता काँग्रेसमध्ये सामील

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीरा भाईंदरमधील अमली पदार्थांचा व्यवसाय होत असलेली अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. यानंतर ठाणे महानगरपालिकेने शहरातील बेकायदा बार आणि पबवर ठाणे बुलडोझर फिरवला. अमली पदार्थांचे मुळे तरुणांचे प्रचंड नुकसान होत आहे. ठाणे आणि मीरा भाईंदर ही शहरे अंमली पदार्थ्यांच्या विळख्यातून मुक्त व्हावीत, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
पुण्याच्या एफसी रोडवरील एका प्रसिद्ध हॉटेलमधील व्हिडिओ समोर आला, ज्यात दोन अल्पवयीन मुले अंमली पदार्थांचे सेवन करताना दिसले. यानंतर पुण्यातील अनधिकृत बांधकाम आणि अंमली पदार्थांना प्रोत्साहन देणार्‍या हॉटेल आणि बारवर कारवाई करण्यात आली. यानंतर एकना शिंदे यांनी ठाणे आणि मीरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पब्ज आणि बारवर कारवाई करण्याचे महापालिकेला आदेश दिले. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त गजानन गोदापूर यांनी सांगितले की, ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत अवैध हुक्का पार्लर आणि ड्रग्ज विक्री करणारे बार आणि रेस्टॉरंट उद्ध्वस्त करण्यास सुरुवात झाली. घटनास्थळी ठाणे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. याशिवाय ठाण्यात अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणार्‍यांवर गुन्हे शाखा नजर ठेवून आहे. ज्या ठिकाणी अशा ड्रग्जची विक्री आणि खरेदी केली जाते, अशा हॉटेल आणि बारवर बुलडोझर फिरवला जात आहे.

COMMENTS