Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बहुजन समाज पार्टीच्यावतीने इफ्तार पार्टी

नांदेड प्रतिनिधी - बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी मनिषभाऊ कावळे यांच्या संकल्पनेतून दलित, बहुजन आणि मुस्लिम समाजातील भाईचारा अधिक

लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मका पिकाची मोठ्या प्रमाणात आवक
विनयभंग प्रकरणी अकोल्यातील भाजप नगरसेवकाला अटक

नांदेड प्रतिनिधी – बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी मनिषभाऊ कावळे यांच्या संकल्पनेतून दलित, बहुजन आणि मुस्लिम समाजातील भाईचारा अधिक वृध्दिंगत व्हावा, यासाठी पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून शहरातील   भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ मुस्लिम समाज बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन  बुधवारी ( दि.29) सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी मिर्झा फय्याज बेग, मयूर पाटील, मिर्झा साहिब बेग, मिर्झा रुमान बेग, मिर्झा मुस्तफा बेग, ड. सोमवंशी यांच्यासह मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आणि आदर स्वागताचा स्विकार करून सामाजिक एकोप्याचा संदेश दिला. यावेळी पवित्र रमजान महिन्यातील रोजा सोडण्यासाठी बसपाच्यावतीने मुस्लिम समाज बांधवांसाठी फळफळावळ आणि विविध खाद्य पदार्थांचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या इफ्तार पार्टीत बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र  प्रभारी मनिषभाऊ कावळे यांनी मुस्लिम समाज बांधवांची गळाभेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच बसपाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव दिगंबर ढोले, प्रदेश सचिव राहुल कोकरे, युवा जिल्हाध्यक्ष विक्कीभाऊ वाघमारे, शहराध्यक्ष बळीराम निखाते, संजय बहादुरे, नारायण घुले, अर्जुन नरवाडे, भिमराव सातोरे, जयवंत थोरात, झुंबर लोणे यांनीही उपस्थित मुस्लिम समाज बांधवांना पवित्र रमजान महिन्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी मिनाक्षी लोणे, शोभाताई लोणे, जयकुंटे, जितेंद्र गोणारकर, नाभिक महामंडळाचे दत्ता सापलकर आदीसह बसपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS