Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 प्रजासत्ताकाची रक्षा करायची असेल तर रक्त नको मत द्या – उद्धव ठाकरे 

ठाणे प्रतिनिधी - प्रजासत्ताकाची रक्षा करायची असेल तर रक्त नको तुमचे मत द्या, असा मताचा जोगवा उद्धव ठाकरे यांनी जैन धर्मियांसमोर मागितला. यावेळ

दुचाकी व दूध टँकरच्या अपघातात तरुणाचा मृत्यू
प्राध्यापक प्रतिभारत्न राष्ट्रीय पुरस्काराने प्रो. डॉ. सविता मेनकुदळे सन्मानीत
माझी चूक झाली, मला फाशी द्यायची तर द्या ः जितेंद्र आव्हाड

ठाणे प्रतिनिधी – प्रजासत्ताकाची रक्षा करायची असेल तर रक्त नको तुमचे मत द्या, असा मताचा जोगवा उद्धव ठाकरे यांनी जैन धर्मियांसमोर मागितला. यावेळी जैन धर्मिय सदैव तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन जैन धर्मगुरूंनी उद्धव ठाकरे यांना दिले. तसेच आज जैन मंदिर येथे जाऊन देखिल दर्शन घेतले. उद्धव ठाकरे हे ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जैन धर्मियांच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. तुम्ही रक्त मागितले तरी ते द्यायला तयार असल्याचे कार्यक्रमातील एका आयोजकाने भाषणात जाहीर केले. त्यावेळेस उद्धव यांनी त्यांच्या भाषणात प्रजासत्ताकाची रक्षा करायची असेल तर रक्त नको मत द्या.. असे म्हणाले. यावेळेस जैन धर्मगुरूंचे आशिर्वाद उद्धव यांनी घेतले. त्यावेळेस धर्मगुरूंनी त्यांना सैदव तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.

COMMENTS