Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टवाळखोरांनो, मुलींची छेडछाड कराल तर याद राखा ; नेरकर

अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात शहरातील शाळा महाविद्यालयांच्या पदाधिकार्‍यांची बैठक

अंबाजोगाई प्रतिनिधी - टवाळखोरांनो मुलींची व महिलांची छेडछाड कराल तर याद राखा. त्यांची छेडछाड करू नका. मुलींना शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेऊ द्य

सुवर्णनगरीत ईडीकडून छापेमारी
जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार पुन्हा उघडले
‘जलयुक्त’ला सरकारची क्लिनचिट नाहीच, जलसंधारण विभागाचे स्पष्टीकरण

अंबाजोगाई प्रतिनिधी – टवाळखोरांनो मुलींची व महिलांची छेडछाड कराल तर याद राखा. त्यांची छेडछाड करू नका. मुलींना शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेऊ द्या .अन्याय, अत्याचार कराल तर तुमची गय केली जाणार नाही. असा सज्जड दम अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी रोड रोमीओंना दिला आहे. शाळा महाविद्यालयातील मुलींना छेडछाड होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. तरुणांमध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारीला वेळीच आळा घालण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात शनिवारी दि 1 जूलै शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयाच्या प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. दरम्यान पोलीस उपाधीक्षक अजित चोरमले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, पोलीस कर्मचारी तानाजी तागड यांची बैठकीस उपस्थिती होती. आयोजित बैठकीमध्ये अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी उपस्थित शाळा महाविद्यालयांच्या प्राचार्य, उपप्राचार्य व मुख्याध्यापकांकडून समस्या जाणून घेतल्या. शाळा, महाविद्यालयात खास करून ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या मुलींच्या सुरक्षिततेबद्दल विचारणा केली. गावाकडे येण्या जाण्यासाठी बसेस वेळेवर सोडण्यात याव्यात. त्याचप्रमाणे महाविद्यालयाजवळ बस थांबा असावा. अशा सूचना बस आगार प्रमुख अमित राऊत यांना अपर पोलीस अधीक्षक नेरकर यांनी दिल्या. दामिनी पथकाच्या माध्यमातून शहरातील शाळा महाविद्यालयात सुसंवाद साधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पॅट्रोलिंगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. गंभीर गुन्हे स्थानिक पातळीवर न सोडवता त्याची तक्रार पोलीस ठाण्यात द्यावी अशा सूचना अपर पोलीस अधीक्षक नेरकर यांनी केल्या आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावर उभारण्यात येणारी ऑटो रिक्षा आणि इतर वाहने थांबल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात याव्यात अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या. शाळा महाविद्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही बसवावेत. मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात. गुड टच व बॅड टच याची माहिती मुलींना द्यावी.याबाबतचे एक दिवसीय प्रशिक्षण महिला शिक्षकांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्या त्या शाळा महाविद्यालयात विशाखा समितीची स्थापना करावी.स्कूल बस मध्ये विद्यार्थिनी सुरक्षित आहेत काय ?याचीही पडताळणी प्रशासनाने करावी. सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने कसा करावा? यासाठी विद्यार्थ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात यावे. असे आवाहन नेरकर यांनी केले.

COMMENTS