Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकत्र लढलो असतो तर सत्ता आली असती : ना. जयंत पाटील

कडेगाव नगरपंचायतीनिमित्ताने काँग्रेसवर टीकाकडेगांव / प्रतिनिधी : महाविकास आघाडी म्हणून एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेलो असतो तर कडेगाव नगरपंचायतीम

सुंदरगडावर साजरा झाला शाही दसरा
पालिकेच्या अग्नीशमन केंद्रावर गाड्या धुण्याचे सेंटर सुरू : विक्रमभाऊ पाटील
म्हसवडमध्ये धुवांधार पाऊस; जनजीवन विस्कळीत

कडेगाव नगरपंचायतीनिमित्ताने काँग्रेसवर टीका
कडेगांव / प्रतिनिधी : महाविकास आघाडी म्हणून एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेलो असतो तर कडेगाव नगरपंचायतीमधील सत्ता आली असती असा टोला पालकमंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसला लगावला. ते देवराष्ट्रे येथे स्व. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
ना. जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचा घटकपक्ष म्हणून आमची प्रमाणिकपणे एकत्र काम करण्याची इच्छा आहे. कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी असती तर चित्र वेगळे दिसले असते. नुकत्याच झालेल्या कडेगाव नगरपंचायतच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. भाजपने 11 जागी विजय मिळवत येथील कॉग्रेसची सत्ता ऊलथवुन टाकली. काँग्रेसला केवळ पाच जागावर विजय मिळवता आला. राष्ट्रवादीने एक जागा मिळवत आपले खाते खोलले आहे.

COMMENTS